IPL 2023, Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Live : २१ वर्षीय यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal) आज इडन गार्डन गाजवले. १३ चेंडूंत वेगवान अर्धशतक झळकावल्यानंतरही यशस्वीच्या बॅटीतून चौकार-षटकारांचा पाऊस सुरूच राहिला. जेसन रॉय शून्यावर रन आऊट झाल्यानंतर यशस्वीने कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांची निर्दयी धुलाई केली. त्याची बॅट चौकार-षटकारांचीच भाषा बोलताना दिसली अन् त्यामुळे राजस्थान रॉयल्सने सहज विजयाची नोंद केली. कर्णधार संजू सॅमसननेही त्याला तोडीसतोड साथ देताना ६९ चेंडूंत नाबाद १२१ धावांची भागीदारी केली. राजस्थानने १३.१ षटकांत ही मॅच ९ विकेट्स राखून जिंकली.
यशस्वी जैस्वालने पहिल्याच षटकात २६ धावा कुटून त्याचा इरादा स्पष्ट केला. कर्णधार नितीश राणाने भलतेच धाडस दाखवले अन् यशस्वीने ६,६,४,४,२,४ अशी फटकेबाजी केली. हर्षित राणाच्या दुसऱ्या षटकात जेसन रॉय ( ०) रन आऊट झाला, परंतु यशस्वीने शेवटच्या दोन चेंडूंवर त्यालाही झोडले. यशस्वीने १३ चेंडूंत अर्धशतक झळकावताना आयपीएल इतिहासातील वेगवान अर्धशतक पूर्ण केलं. त्याने लोकेश राहुल व ( १४) व पॅट कमिन्स ( १४) यांचा विक्रम मोडला. यानंतरही यशस्वीचा आक्रमक पवित्रा कायम होता आणि त्याने संजू सॅमसनसह RRला ८ षटकांत १०० धावा करून दिल्या. यशस्वी जैस्वालच्या एका षटकातील २६ धावांचा व्हिडीओ
यशस्वीने पॉवर प्लेमध्ये आज ६२ धावा केल्या आणि डेव्हिड वॉर्नरच्या विक्रमाशी बरोबरी केली. सुरेश रैनाने पंजाब किंग्सविरुद्ध पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक ८७, अॅडम गिलख्रिस्टने ७४ ( वि. दिल्ली) आणि इशान किशन ६३( वि, हैदराबाद) यांनी हा विक्रम केलेला. सुनील नरीनने त्याच्याच गोलंदाजीवर संजूचा ( १६) झेल टाकला आणि त्यांनी कमबॅकची संधी गमावली. जीवदान मिळाल्यानंतर संजूनेही हात मोकळे केले. संजूने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ५००० धावांचा टप्पा ओलांडला. संजूने ११व्या षटकात अनुकूल रॉयला तीन खणखणीत षटकार खेचले. संजू व यशस्वी यांनी ५८ चेंडूंत शतकी भागीदारी पूर्ण केली. संजूने २९ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ४८ धावा केल्या. यशस्वीने ४७ चेंडूंत १२ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ९८ धावा केल्या.
आयपीएलच्या आणखी महत्त्वाच्या बातम्या
जोफ्रा आर्चरने 'इंग्लंड'कडून कधी खेळायचे हे Mumbai Indians ठरवणार; धक्कादायक Report
शिमरोन नाही सुपरमॅन! Six जाणारा चेंडू हेटमायरने अचंबितरित्या टिपला अन्... Video
युजवेंद्र चहलने 'इतिहास' घडविला, ड्वेन ब्राव्होचा सर्वात मोठा विक्रम मोडला
मी पाहिलेली सर्वोत्तम फलंदाजी! यशस्वी जैस्वालची पाठ विराट कोहली, KL Rahul ने थोपटली
तत्पूर्वी, वेंकटेश अय्यर ( ५७ ) वगळल्यास KKRकडून आज कोणाला फार कमाल करता आली नाही. RRच्या गोलंदाजांनी कमाल केलीच, परंतु त्यांना खेळाडूंनी अफलातून झेल व उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करून दर्जेदार साथ दिली. युजवेंद्र चहलने ४ विकेट्स घेताना आयपीएल इतिहासात सर्वाधिक बळी टिपण्याचा विक्रम नावावर केला. जेसन रॉय ( १०) व रहमनुल्लाह गुरबाज ( १८) यांचे अनुक्रमे शिमरोन हेटमायर व संदीप शर्मा यांनी अप्रतिम झेल टिपले. वेंकटेश अय्यर व नितीश राणा ( २२) यांनी ४८ धावांची भागीदारी केली. आंद्रे रसेल ( १०) अश्विनच्या हाती झेलबाद झाला. कोलकाताला ८ बाद १४९ धावांवर समाधान मानावे लागले.