IPL 2023, KKR Vs SRH: हैदराबादविरुद्ध KKR ने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय, अशी आहे टीम इलेव्हन 

IPL 2023, KKR Vs SRH Live Updates: आयपीएलमध्ये आज सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होत असलेल्या लढतीत कोलकाता नाईटरायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 07:15 PM2023-04-14T19:15:04+5:302023-04-14T19:15:34+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, KKR Vs SRH: KKR Win Toss Against Hyderabad, Decide To Field First, Here's Team XI | IPL 2023, KKR Vs SRH: हैदराबादविरुद्ध KKR ने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय, अशी आहे टीम इलेव्हन 

IPL 2023, KKR Vs SRH: हैदराबादविरुद्ध KKR ने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय, अशी आहे टीम इलेव्हन 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयपीएलमध्ये आज सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होत असलेल्या लढतीत कोलकाता नाईटरायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी कोलकाता नाईटरायडर्सने संघात कुठलाही बदल केलेला नाही. तर सनरायझर्स हैदराबादने संघामध्ये एक बदल करताना वॉशिंग्टन सुंदरच्या जागी अभिषेक शर्मा याला संघात स्थान दिले आहे. 

कोलकाता नाईटरायडर्सचा संघ यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. दरम्यान, मागच्या सामन्यात कोलकाता नाईटरायडर्सने गुजरात टायटन्सवर सनसनाटी विजय मिळवला होता. त्या सामन्यात रिंकू सिंहने शेवटच्या षटकात पाच षटकार ठोकत कोलकात्याला विजय मिळवून दिला होता. तर सनरायझर्स हैदरााबादने पंजाब किंग्सविरुद्ध विजय मिळवून आपली पराभवांची मालिका खंडित केली होती.

दरम्यान, आज नाणेफेक जिंकल्यानंतर कोलकात्याचा कर्णधार नितीश राणाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. येथे सामन्याच्या उत्तरार्धात मैदानावर दव पडण्याची शक्यता विचारात घेऊन नितीश राणा याने प्रथम क्षेत्ररक्षण करून नंतर धावांचा पाठलाग करण्याची रणनीती आखल्याचे सांगितले. 
अंतिम संघ 
कोलकाता नाईटरायडर्स - रहमनुल्लाह गुरबाझ (यष्टीरक्षक), नारायण जगदिशन, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती, सुयश शर्मा. 
सनरायझर्स हैदराबाद - अभिषेक शर्मा, हॅरी ब्रुक, मयांक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडेन मार्क्रम (कर्णधार). हेंद्रिक क्लासेन, मार्को यान्सेन, मयांक मार्कंडेय, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी. नटराजन.  

Web Title: IPL 2023, KKR Vs SRH: KKR Win Toss Against Hyderabad, Decide To Field First, Here's Team XI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.