इंडियन प्रीमिअर लीगमधील ( IPL 2023) संघ कोलकाता नाईट रायडर्सने ( Kolkata Knight Riders) बुधवारी त्यांच्या मुख्य प्रशिक्षकपदी भारतातील सर्वात यशस्वी व्यक्तीची निवड केली. न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि इंग्लंडच्या कसोटी संघाचा सध्याचा मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्यूलम याच्याकडे आयपीएल २०२२ पर्यंत ही जबाबदारी होती. पण, आता शाहरूख खानच्या मालकी हक्क असलेल्या KKR ने भारताचे माजी कसोटीपटू चंद्रकांत पंडित ( Chandrakant Pandit) यांच्या खांद्यावर मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवली आहे. KKR announced that Chandrakant Pandit would be its new head coach
कोलकाता नाईट रायडर्सने २०१२ व २०१४ मध्ये आयपीएल जेतेपद पटकावले होते. त्यानंतर २०२१ मध्ये त्यांना उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०११, २०१६, २०१७ व २०१८मध्ये त्यांनी प्ले ऑफमध्ये धडक मारली होती, परंतु अन्य पर्वात त्यांची कामगिरी निराशाजनक झाली. आयपीएल २०२२मध्ये ब्रेंडन मॅक्यूलम व कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा रंगली होती. त्यातूनच KKR ने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.
ही घोषणा करताना KKR चे सीईओ वेंकी मैसोर म्हणाले की,''आयपीएलमधील पुढील प्रवासात चंदू आमच्या कुटुंबात दाखल झाल्यामुळे खूप आनंदी आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. श्रेयस अय्यर आणि त्यांची एकत्रिक कामगिरी कशी होते, याची उत्सुकता आहे.''
चंद्रकांत पंडित म्हणाले, ही जबाबदारी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. KKR फॅमिली संकृतीबद्दल मी खेळाडूंकडून व इतरांकडून ऐकलं होतं आणि आता मी त्या कुटुंबाचा सदस्य झालो आहे.
चंद्रकांत पंडित यांची रणजी करंडक स्पर्धेत प्रशिक्षक म्हणून कामगिरी२००३ मध्ये मुंबईला जेतेपद२००४ मध्ये मुंबईला जेतेपद२०१६मध्ये मुंबईला जेतेपद २०१८ मध्ये विदर्भला जेतेपद२०१९मध्ये विदर्भला जेतेपद२०२२ मध्ये मध्य प्रदेशला जेतेपद