Indian Premier League 2023 - इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ही महेंद्रसिंग धोनीची ( MS Dhoni) खेळाडू म्हणून अखेरची IPL असल्याची चर्चा सुरू आहे. तशी ती दोन-तीन वर्षांपूर्वीही सुरू होतीच. पण, यंदाची आयपीएल खास आहे कारण यंदा चेन्नई सुपर किंग्सला त्यांच्या घरच्या मैदानावर खेळता येणार आहे. धोनीला चेपॉकवर खेळताना पाहता येणार असल्याने चाहतेही प्रचंड खूश झाले आहेत. CSK व्यवस्थापनाने धोनीच्या चेपॉकवरील शेवटच्या सामन्यासाठी जय्यत तयारीही सुरू केली आहे. CSK प्ले ऑफसाठी पात्र न ठरल्यास १४ मे ( कोलकाता नाइट रायडर्स) रोजी होणारा सामना हा धोनीचा चेपॉकवरील अखेरचा ठरू शकतो. धोनीला धुमधडाक्यात निरोप देण्यासाठी सर्व सज्ज असताना चेन्नईचं टेंशन वाढवणारी बातमी समोर आली आहे.
महेंद्रसिंग धोनीनंतर CSK च्या कर्णधारपदाच्या शर्यतीत तीन नावं
न्यूझीलंड आणि चेन्नई सुपर किंग्सचा जलदगती गोलंदाज कायले जेमिन्सन ( Kyle Jamieson) याला दुखापत झाली आहे आणि त्याने आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे आणि तो ३-४ महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. त्यामुळे आयपीएल २०२३ मध्ये त्याच्या खेळण्याची शक्यता कमीच आहे. अशात तो थेट ऑगस्टमध्ये होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यावरून पुनरागमन करणार आहे. CSK लवकरच जेमिन्सनच्या जागी कोणाला निवडायचे याची घोषणा करणार आहेत.
''जेमिन्सनच्या पाठीला दुखापत झाली आहे आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे त्याचे वेळेत तंदुरुस्त होणे हे आव्हानात्मक आहे आणि हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे,''असे न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले. चेन्नई सुपर किंग्सकडे त्याच्याजाघी महिष थिक्षाना, निशांत संधू, तुषार देशपांडे आणि मथिशा पथिराना हे पर्याय आहेत.
चेन्नई सुपर किंग्सचे वेळापत्रक...
- ३१ मार्च - गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, अहमदाबाद- सायंकाळई ७.३० वा. पासून
- ३ एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स वि. लखनौ सुपर जायंट्स, चेन्नई - सायंकाळी ७.३० वा. पासून
- ८ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई - सायंकाळी ७.३० वा. पासून
- १२ एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स, चेन्नई - सायंकाळी ७.३० वा. पासून
- १७ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स, बंगळुरू - सायंकाळी ७.३० वा.पासून
- २१ एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स वि. सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई - सायंकाळी ७.३० वा.पासून
- २३ एप्रिल - कोलकाता नाईट रायडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स कोलकाता - सायंकाळी ७.३० वा.पासून
- २७ एप्रिल ० राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, जयपूर - सायंकाळी ७.३० वा.पासून
- ३० एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स वि. पंजाब किंग्स, मुंबई - दुपारी ३.३० वा.पासून
- ४ मे - लखनौ सुपर जायंट्स वि. चेन्नई सुपर किंग्स, लखनौ - दुपारी ३.३० वा. पासून
- ६ मे - चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई - दुपारी ३.३० वा. पासून
- १० मे - चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई - सायंकाळी ७.३० वा.पासून
- १४ मे - चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, चेन्नई, - सायंकाळी ७.३० वा.पासून
- २० मे - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली - दुपारी ३.३० वा. पासून
चेन्नई सुपर किंग्सचा संघ - महेंद्रसिंग धोनी, बेन स्टोक्स, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, दीपक चहर, अजिंक्य रहाणे, थिक्साना महिषा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, ड्वेन प्रेटोरियस, मुकेश चौधरी, समिरजीत सिंग, मथिशा पथिराना, तुषार देशपांडे, मिचेल सँटनर, राजवर्धन हंगर्गेकर, प्रशांत सोलंकी, सुभ्रांषू सेनापती, शैक राशीद, निशांत सिंधू, कायले जेमिन्सन, अजय मंडल, भगत वर्मा.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"