Join us  

IPL 2023 : IPLमधील हा खेळाडू ६७० जणांवर भारी, विराट, रोहित, गेललाही टाकं मागे, बनवला खास रेकॉर्ड, आता कर्णधार धर्मसंकटात

IPL 2023 LSG Vs SRH Live Updates : लखनौला आज संघ निवडताना एका मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. हे आव्हान निर्माण केलं आहे ते काइल मायर्सने.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2023 5:19 PM

Open in App

आयपीएलमध्ये आज होणाऱ्या लढतीत लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने येणार आहेत. दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यात लखनौ सुपरजायंट्सने एक विजय आणि एक पराभव पत्करावा लागला आहे. दरम्यान, लखनौला आज संघ निवडताना एका मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. हे आव्हान निर्माण केलं आहे ते काइल मायर्सने.

क्विंटन डी कॉकच्या गैरहजेरीत लखनौ सुपरजायंट्सने पहिल्या दोन सामन्यात काइल मायर्सला सलामीला उतरवले होते. या संधीचा फायदा उठवत मायर्सने आयपीएलमधील पदार्पणातच अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही त्याने तुफानी अर्धशकत ठोकलं. आयपीएलच्या १६ हंगामांमध्ये मिळून आतापर्यंत ६७१ खेळाडू खेळले आहेत. त्यामध्ये काइल मायर्स हा एकमेव फलंदाज आहे ज्याने आयपीएलमधील आपल्या पहिल्या दोन्ही डावांत अर्धशतकी खेळी केल्या आहेत.

काइल मायर्सने आयपीएलमधील आपल्या पदार्पणाच्या सामन्यात ३८ चेंडूत ७३ धावांची तुफानी खेळी केली होती. त्यानंतर मायर्सने चेन्नई सुपरकिंग्सविरुद्धही तुफानी खेळी केली. त्या सामन्यात या फलंदाजाने २१८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना २२ चेंडूत २४० च्या स्ट्राइक रेटसह ५३ धावा कुटल्या होत्या. या खेळीनंतर मायर्सने आपीएल खेळण्याचं आपलं स्वप्न होतं, ते आता पूर्ण झालं, अशी प्रतिक्रिया दिली होती.

दरम्यान, यंदाच्या आयपीएलमधील पहिल्या दोन सामन्यांत दोन तुफानी खेळी करून मायर्सने कर्णधार के.एल. राहुल आणि मेंटॉर गौतम गंभीर यांना धर्मसंकटात टाकले आहे. आता दिग्गज फलंदाज क्विंटन डी कॉक लखनौच्या संघात दाखल झाला आहे. गेल्या हंगामात त्यानेच लखनौकडून सलामीला फलंदाजी केली होती. तसेच हल्लीच्या काळात त्याचा फॉर्मही जबरदस्त राहिलेला आहे. अशा परिस्थितीत हैदराबादविरुद्धच्या सामन्यात क्विंटन डी कॉकला सलामीला पाठवल्यास कायल मायर्सचं काय करायचं, असा प्रश्न संघव्यवस्थापनाला पडला  आहे.  

टॅग्स :आयपीएल २०२३लखनौ सुपर जायंट्सटी-20 क्रिकेट
Open in App