IPL 2023 : गुजरात टायटन्सने १० कोटी रुपयांसाठी मॅच विनिंग खेळाडूला संघाबाहेर केले; KKR ने साधली संधी

IPL 2023 Mini Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२३ पर्वाच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. २३ डिसेंबरला आयपीएल २०२३ साठी मिनी ऑक्शन होणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 12:12 PM2022-11-13T12:12:03+5:302022-11-13T12:12:24+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 : Lockie Ferguson and Rahmanullah Gurbaz traded from Gujarat Titans to Kolkata Knight Riders, Ferguson was bought by the Titans for INR 10 crore at the IPL 2022 mega auction | IPL 2023 : गुजरात टायटन्सने १० कोटी रुपयांसाठी मॅच विनिंग खेळाडूला संघाबाहेर केले; KKR ने साधली संधी

IPL 2023 : गुजरात टायटन्सने १० कोटी रुपयांसाठी मॅच विनिंग खेळाडूला संघाबाहेर केले; KKR ने साधली संधी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023 Mini Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२३ पर्वाच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. २३ डिसेंबरला आयपीएल २०२३ साठी मिनी ऑक्शन होणार आहे आणि त्यापूर्वी १५ नोव्हेंबरपर्यंत सर्व फ्रँचायझींना आपापल्या संघातील रिटेन ( कायम ) केलेल्या खेळाडूंची यादी सादर करायची आहे. काल मुंबई इंडियन्सने हुकूमी एक्का किरॉन पोलार्डसह पाच खेळाडूंना रिलीज केल्याचे वृत्त येऊन धडकले. त्यांनी जेसन बेहरेनडॉर्फला RCB कडून आपल्या ताफ्यात घेतल्याची अधिकृत घोषणा केली. आज गतविजेत्या गुजरात टायटन्सने ( Gujarat Titans) धक्कादायक निर्णय घेतला, परंतु यात कोलकाता नाइट रायडर्सचा ( Kolkata Knight Riders) फायदा झाला.

आयपीएल २०२३ साठी KKR ने गुजरात टायटन्सकडून दोन खेळाडूंना आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. न्यूझीलंडचा गोलंदाज ल्युकी फर्ग्युसन आणि अफगाणिस्तानचा स्फोटक यष्टीरक्षक-फलंदाज रहमनुल्लाह गुर्बाज यांना गुजरात टायटन्सने रिलीज केले. गतविजेत्या गुजरात टायटन्सने १० कोटींत आपल्या ताफ्यात दाखल केले होते. गुजरातच्या जेतेपदाता फर्ग्युसनचाही मोठा वाटा होता आणि त्याने १२ विकेट्स घेतल्या होत्या. फर्ग्युसन २०१९-२०२१ या कालावधीत KKR कडून खेळला होता आणि २०२२च्या लिलावात त्याला फ्रँचायझीने रिलीज केले होते.  


आयपीएल २०२२मध्ये इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय याने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतल्यानंतर गुर्बाजला रिप्लेसमेंट म्हणून गुजरातने आपल्या संघात घेतले. पण, त्याला एकही सामना खेळण्याची संधी दिली गेली नाही. पण, आशिया चषक आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत गुर्बाजने त्याच्या आक्रमक खेळीने सर्वांचे लक्ष वेधले.   

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"     

Web Title: IPL 2023 : Lockie Ferguson and Rahmanullah Gurbaz traded from Gujarat Titans to Kolkata Knight Riders, Ferguson was bought by the Titans for INR 10 crore at the IPL 2022 mega auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.