IPL 2023, LSG vs CSK Live : ५ षटकांत ४२ किंवा १० षटकांत ७६ धावा? चेन्नई सुपर किंग्ससमोर असं असू शकतं लक्ष्य

IPL 2023, Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Live Marathi : चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातला सामना पावसामुळे थांबला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 06:50 PM2023-05-03T18:50:44+5:302023-05-03T18:55:10+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, LSG vs CSK Live Marathi : Rain stops play in Lucknow,  If LSG don't bat again, CSK's target will be this - 5 overs - 42. 10 overs - 76. 15 overs - 106. 18 overs - 122. 19 overs - 127. | IPL 2023, LSG vs CSK Live : ५ षटकांत ४२ किंवा १० षटकांत ७६ धावा? चेन्नई सुपर किंग्ससमोर असं असू शकतं लक्ष्य

IPL 2023, LSG vs CSK Live : ५ षटकांत ४२ किंवा १० षटकांत ७६ धावा? चेन्नई सुपर किंग्ससमोर असं असू शकतं लक्ष्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Live Marathi : चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातला सामना पावसामुळे थांबला आहे. CSK च्या फिरकीपटूंनी खेळपट्टीचा पुरेपूर उपयोग करताना LSG चा निम्मा संघ ४४ धावांत माघारी पाठवला होता. निकोलस पूरन व आयुष बदोनी यांची अर्धशतकी भागीदारी सामन्याला कलाटणी देणारी ठरली. आयुषने वैयक्तिक अर्धशतक झळकावले आणि संघाला १९.२ षटकांत ७ बाद १२५ धावांपर्यंत पोहोचवले. मात्र पावसाच्या हजेरीमुळे ही मॅच बराच वेळ थांबली आहे. 


धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कायले मायर्स ( १४), मनन वोहरा ( १०), कृणाल पांड्या ( ०), मार्कस स्टॉयनिस ( ६) आणि करण शर्मा ( ९) एकेरी धावेत माघारी परतले. आयुष बदोनी आणि निकोलस पूरन यांनी CSKच्या गोलंदाजांचा सामना करताना ५९ धावांची भागीदारी केली. निकोलस २० धावांवर मोईन अलीच्या हाती सोपा झेल देऊन माघारी परतला. मोईन अली, महीशा तीक्षणा व मथिशा पथिराणा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. पावसामुळे १९.२ षटकांत ७ बाद १२५ धावांवर सामना थांबवण्यात आला. आयुष ३३ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ५९ धावांवर नाबाद राहिला. 


जर लखनौ सुपर जायंट्स पुन्हा फलंदाजीला आले नाही तर, चेन्नई किंग्ससमोर असं असू शकतं लक्ष्य
5 overs - 42.
10 overs - 76.
15 overs - 106.
18 overs - 122.
19 overs - 127.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IPL 2023, LSG vs CSK Live Marathi : Rain stops play in Lucknow,  If LSG don't bat again, CSK's target will be this - 5 overs - 42. 10 overs - 76. 15 overs - 106. 18 overs - 122. 19 overs - 127.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.