IPL 2023, LSG vs CSK Live : आयुष बदोनी चेन्नईला भिडला; पावसामुळे खेळ थांबला, गौतम गंभीर पुन्हा चर्चेत आला

IPL 2023, Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Live Marathi : चेन्नई सुपर किंग्सच्या फिरकीपटूंनी खेळपट्टीचा पुरेपूर उपयोग करताना लखौन सुपर जायंट्सला धक्के दिले.पण, २३ वर्षीय खेळाडू चमकला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 05:30 PM2023-05-03T17:30:31+5:302023-05-03T17:31:29+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, LSG vs CSK Live Marathi : Rain stops play in Lucknow, LSG 125/7 in 19.2 overs, (Ayush Badoni 59*; Moeen Ali 2/13), Gautam Gambhir appreciating Ayush | IPL 2023, LSG vs CSK Live : आयुष बदोनी चेन्नईला भिडला; पावसामुळे खेळ थांबला, गौतम गंभीर पुन्हा चर्चेत आला

IPL 2023, LSG vs CSK Live : आयुष बदोनी चेन्नईला भिडला; पावसामुळे खेळ थांबला, गौतम गंभीर पुन्हा चर्चेत आला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Live Marathi : चेन्नई सुपर किंग्सच्या फिरकीपटूंनी खेळपट्टीचा पुरेपूर उपयोग करताना लखौन सुपर जायंट्सला धक्के दिले. लखनौमधील मागील सामनाही कमी धावसंख्येचाच झाला होता, परंतु कडवी टक्कर पाहायला मिळाली होती. त्यामुळे महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि फिरकी गोलंदाजांनी पहिल्या १० षटकांत LSGचा निम्मा संघ माघारी पाठवला. निकोलस पूरन व आयुष बदोनी यांची अर्धशतकी भागीदारी सामन्याला कलाटणी देणारी ठरली. आयुषने वैयक्तिक अर्धशतक झळकावले. 

वडिलांच्या स्मरणार्थ सचिन तेंडुलकर मध्य प्रदेशमध्ये शाळा बांधणार, मोफत शिक्षण देणार


धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवताना लखनौच्या ३ फलंदाजांना २७ धावांवर माघारी पाठवले. कायले मायर्सला ( १४) चौथ्या षटकात मोईन अलीने माघारी पाठवले. महीश तीक्षणाने सहाव्या षटकात सलग दोन धक्के दिले. मनन वोहरा ( १०) याचा त्रिफळा उडवल्यानंतर कर्णधार कृणाल पांड्याला ( ०) त्याने माघारी पाठवले. अजिंक्य रहाणेने स्लीपमध्ये अप्रतिम झेल टिपला. पुढच्या षटकात रवींद्र जडेजाने जबरदस्त वळण घेणारा चेंडू टाकला अन् मार्कस स्टॉयनिसचा त्रिफळा उडवला. LSGचा खेळाडूला विश्वासही बसेनासा झाला होता. अलीने १०व्या षटकात त्याच्याच गोलंदाजीवर झेल टिपला आणि करण शर्माल ( ९) बाद केले. लखनौचा निम्मा संघ ४४ धावांत माघारी परतला.

 
मागच्या सामन्यात अपयशी ठरलेला आयुष बदोनी आणि निकोलस पूरन यांनी CSKच्या गोलंदाजांचा सामना करताना ५९ धावांची भागीदारी करून LSGला शतकाची वेस ओलांडून दिली. या दोघांचा संयमी खेळ चेन्नईची डोकेदुखी वाढवताना दिसला आणि त्यामुळेच धोनीने जलदगती गोलंदाज मथीशा पथिराणाला आणले. त्याने १८व्या षटकात ही भागीदारी तोडली. निकोलस २० धावांवर मोईन अलीच्या हाती सोपा झेल देऊन माघारी परतला. आयुषने ३१ चेंडूत अर्धशतक झळकावताना CSKसमोर सन्मानजनक धावा उभ्या केल्या. मोईन अली, तीक्षणा व पथिराणा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

Image

पावसामुळे १९.२ षटकांत ७ बाद १२५ धावांवर सामना थांबवण्यात आला. आयुष ३३ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ५९ धावांवर नाबाद राहिला. गौतम गंभीरने आयुषच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. दरम्यान गौतम गंभीर अम्पायर्ससोबत चर्चा करताना दिसला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IPL 2023, LSG vs CSK Live Marathi : Rain stops play in Lucknow, LSG 125/7 in 19.2 overs, (Ayush Badoni 59*; Moeen Ali 2/13), Gautam Gambhir appreciating Ayush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.