IPL 2023, Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Live Marathi : चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स ( CSK vs LSG) यांच्यात सामना होतोय आणि धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. केएल राहुलच्या अनुपस्थितीत कृणाल पांड्या LSGचे नेतृत्व करतोय. चेन्नईच्या संघात आकाश सिंगच्या जागी आज दीपक चहरची एन्ट्री झाली आहे. चहर दुखापतीमुळे दोन-तीन आठवडे बाहेर होता. धोनीचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवताना लखनौच्या ३ फलंदाजांना २७ धावांवर माघारी पाठवले.
तुम्ही ठरवलंय, ही माझी शेवटची आयपीएल! MS Dhoniचं विधान अन् निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम?
कायले मायर्स व मनन वोहरा ही जोडी आज LSGसाठी सलामीला आली. मायर्सला ( १४) चौथ्या षटकात मोईन अलीने माघारी पाठवले. त्यापाठोपाठ महिष तीक्षणाने सहाव्या षटकात सलग दोन चेंडूंवर दोन धक्के दिले. मनन वोहरा ( १०) याचा त्रिफळा उडवल्यानंतर कर्णधार कृणाल पांड्याला ( ०) त्याने माघारी पाठवले. अजिंक्य रहाणेने स्लीपमध्ये अप्रतिम झेल टिपला. पुढच्या षटकात रवींद्र जडेजाच्या फिरकीने मार्कस स्टॉयनिसला अचंबित केले. जडेजाचा चेंडू डावीकडून उजवीकडे एवढ्या वेगाने वळला की त्याने स्टॉयनिसचा त्रिफळा उडवला. LSGचा खेळाडूला विश्वासही बसेनासा झाला होता. लखनौला ९ षटकांत ४ बाद ४२ धावा करता आल्या आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"