Join us  

IPL 2023, LSG vs MI Live : प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित नाही माहित, पण...; रोहित शर्मा पराभवानंतर बरंच बोलला

IPL 2023, Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Marathi : थरारक विजयाची नोंद करण्यात तरबेज असलेल्या मुंबई इंडियन्सला आज पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 12:10 AM

Open in App

IPL 2023, Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Marathi : थरारक विजयाची नोंद करण्यात तरबेज असलेल्या मुंबई इंडियन्सला आज पराभव पत्करावा लागला. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात २०व्या षटकात ११ धावांची गरज असताना टीम डेव्हिड व कॅमेरून ग्रीन हे स्फोटक फलंदाज मैदानावर होते, परंतु मोहसिन खानने ( Mohsin Khan) अप्रतिम षटक टाकून MIला ५ धावाच दिल्या अन् LSG ने ५ धावांनी हा सामना जिंकला. या विजयाबरोबर LSG ने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. मुंबई १४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर सरकले. 

३ फलंदाज ३५ धावांवर माघारी परतल्यानंतर मार्कस स्टॉयनिस आणि कृणाल पांड्या यांनी चौथ्या विकेटसाठी ५९ चेंडूंत ८२ धावांची भागीदारी करून लखनौला रुळावर आणले. पांड्या ४२ चेंडूंत ४९ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. अखेरच्या षटकात निकोलस पूरन व स्टॉयनिस यांनी २४ चेंडूंत ६० धावा जोडल्या. लखनौने २० षटकांत ३ बाद १७७ धावा केल्या. स्टॉयनिस ४७ चेंडूंत ४ चौकार व ८ षटकारांसह ८९  धावांवर नाबाद राहिला.

आयपीएलच्या अन्य महत्त्वाच्या बातम्या  

मृत्यूने कवटाळण्यापूर्वी, मला...: MS Dhoni ने साईन केलेली जर्सी दाखवताना सुनील गावस्कर भावूक

कृणाल पांड्याने Mumbai Indians ला उल्लू बनवलं? त्याच्या डावाने दिला घाव! 

मुंबई इंडियन्सचे स्थान डगमगले; MIला बाहेर फेकण्यासाठी दोन संघ सरसावले

१७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा (३७) व इशान किशन ( ५९) यांनी ९.४ षटकांत ९० धावा चढवल्या.  पण हे दोघं माघारी परतले अन् सूर्यकुमार यादव ( ७),  नेहल वढेरा ( १६) व विष्णू विनोद ( २) लगेच बाद झाले. मुंबईला १२ चेंडूंत ३० धावा हव्या होत्या आणि कॅमेरून ग्रीन व डेव्हिड ही स्फोटक जोडी मैदानावर होती, परंतु त्यांनाही अपयश आले.  मुंबईला ५ बाद १७१ धावा करता आल्या. लखनौने ५ धावांनी मॅच जिंकली, डेव्हिड १९ धावांत ३२ धावांवर नाबाद राहिला. या दोघांना ६ चेंडूंत ११ धावा नाही करता आल्या. 

रोहित शर्मा म्हणाला...मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, "आम्ही सामना गमावला. आम्ही जिंकण्यासाठी पुरेसे चांगले खेळलो नाही. असे काही क्षण होते की ज्याचा आम्ही फायदा उचलू शकलो नाही. दुर्दैवी पण आम्हाला पुढच्या सामन्यासाठी मनोबल उंचावत ठेवण्याची गरज आहे. खेळपट्टी  पूर्वीसारखी खेळपट्टी नव्हती. त्यावर फलंदाजी करणे चांगले होते. पण दुसऱ्या हाफमध्ये आम्ही आमची लय गमावली. शेवटच्या षटकांत आम्ही खूप धावा दिल्या. आम्ही ज्या पद्धतीने सुरुवात केली होती, त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आम्ही चांगल्या स्थितीत होतो. प्ले ऑफचे गणित कसे आहे, हे मला माहीत नाही. आम्हाला या पराभवातून बाहेर पडून शेवटचा सामना जिंकायचा आहे." 

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्सलखनौ सुपर जायंट्सरोहित शर्मा
Open in App