IPL 2023, LSG vs MI Live : मुंबई इंडियन्सने 'माती' खाल्ली; सूर्यकुमारच्या विकेटने मॅच फिरली, LSG ची भरारी

IPL 2023, Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Marathi : निराशाजनक सुरुवातीनंतर लखनौ सुपर जायंट्सने धावांचा डोंगर उभा केला, तर दुसरीकडे ९० धावांची सलामी देऊनही मुंबई इंडियन्सला संघर्ष करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 11:33 PM2023-05-16T23:33:38+5:302023-05-16T23:35:51+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, LSG vs MI Live Marathi : Lucknow Super Giants Won by 5 Run(s), MOHSIN KHAN - THE HERO OF LSG, MI needed 11 in 6 balls with David and Green - 0,1,1,0,1,1 | IPL 2023, LSG vs MI Live : मुंबई इंडियन्सने 'माती' खाल्ली; सूर्यकुमारच्या विकेटने मॅच फिरली, LSG ची भरारी

IPL 2023, LSG vs MI Live : मुंबई इंडियन्सने 'माती' खाल्ली; सूर्यकुमारच्या विकेटने मॅच फिरली, LSG ची भरारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Marathi : निराशाजनक सुरुवातीनंतर लखनौ सुपर जायंट्सने धावांचा डोंगर उभा केला, तर दुसरीकडे ९० धावांची सलामी देऊनही मुंबई इंडियन्सचा डाव गडगडला. १७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व इशान किशन यांनी ९.४ षटकांत ९० धावा चढवल्या. पण, दोघांची विकेट पडली अन् सूर्यकुमार यादवने आत्मघातकी शॉट मारून LSGला विकेट दिली. MIला सोपा वाटणारा हा सामना बघताबघता अवघड झाला अन् LSGने डाव फिरवला. 


रोहित शर्मा व इशान किशन यांनी मुंबईला आक्रमक सुरूवात करून देताना ९० धावांची सलामी दिली. रवी बिश्नोईने १०व्या षटकात ९० धावांची भागीदारी तोडली. रोहित २५ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ३७ धावांवर झेलबाद झाला. बिश्नोईने पुढच्या षटकात इशान किशनची विकेट मिळवून दिली. इशान ३९ चेंडूंत ८ चौकार व १ षटकार खेचून ५९ धावांवर झेलबाद झाला. मुंबईची सर्व भीस्त आता सूर्यकुमार यादववर होती आणि त्याचाच खेळ पाहण्यासाठी चाहते स्टेडियमवर आले होते. पण, यश ठाकूरच्या गोलंदाजीवर सुपला मारण्याचा प्रयत्न फसला अन् ७ धावांवर त्याचा दांडा उडाला.  


सूर्याच्या विकेटने LSGच्या सामन्यात डोकं वर काढण्याची संधी मिळाली आणि १७    व्या षटकात मोहसिन खानने पहिल्याच चेंडूवर नेहल वढेराची ( १६) विकेट घेतली. टीम डेव्हिडवर आता सर्व मदार होती आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून विष्णू विनोदला MIने पाठवले. मागच्या सामन्यात त्याने दमदार फटकेबाजी केली होती. यश ठाकूरने १८व्या षटकात विष्णूची ( २) विकेट घेतली आणि निकोलस पूरनने सीमारेषेवर उत्कृष्ट झेल टिपला. मुंबईला १२ चेंडूंत ३० धावा हव्या होत्या आणि कॅमेरून ग्रीन व डेव्हिड ही स्फोटक जोडी मैदानावर होती. 

आयपीएलच्या अन्य महत्त्वाच्या बातम्या 
 

मृत्यूने कवटाळण्यापूर्वी, मला...: MS Dhoni ने साईन केलेली जर्सी दाखवताना सुनील गावस्कर भावूक

कृणाल पांड्याने Mumbai Indians ला उल्लू बनवलं? त्याच्या डावाने दिला घाव! 

सुपला, चुकला! सूर्यकुमार यादवचा 'दांडा' उडाला, MIचा फलंदाज जागेवरच बसला Video


डेव्हिडने १९व्या षटकात पहिल्या तीन चेंडूंवर ८ धावा जमवल्या अन् तिसरा चेंडू फुलटॉस पडला अन् चौकार गेला. NO Ball + ४ धावा मुंबईला मिळाल्याने सामना पुन्हा फिरला. पण, त्यानंतर नवीने दोन चेंडू निर्धाव टाकले, परंतु अखेरच्या चेंडूवर डेव्हिडने षटकार खेचून ६ चेंडूंत ११ धावा असा सामना आणला. मोहसिनच्या पहिल्या ३ चेंडूंवर २ धावा मिळाल्या अन् ३ चेंडूंत ९ धावा असा सामना आला. पुढेही १ धाव दिल्याने १ चेंडू ८ धावा अशी मॅच आली आणि लखनौने बाजी पलटवली. मुंबईला ५ बाद १७१ धावा करता आल्या. लखनौने ५ धावांनी मॅच जिंकली, डेव्हिड १९ धावांत ३२ धावांवर नाबाद राहिला.

 
तत्पूर्वी, ३ फलंदाज ३५ धावांवर माघारी परतल्यानंतर मार्कस स्टॉयनिस आणि कृणाल पांड्या यांनी चौथ्या विकेटसाठी ५९ चेंडूंत ८२ धावांची भागीदारी करून लखनौला रुळावर आणले. पांड्या ४२ चेंडूंत ४९ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. अखेरच्या षटकात निकोलस पूरन व स्टॉयनिस यांनी २४ चेंडूंत ६० धावा जोडल्या. लखनौने २० षटकांत ३ बाद १७७ धावा केल्या. स्टॉयनिस ४७ चेंडूंत ४ चौकार व ८ षटकारांसह ८९  धावांवर नाबाद राहिला.

Web Title: IPL 2023, LSG vs MI Live Marathi : Lucknow Super Giants Won by 5 Run(s), MOHSIN KHAN - THE HERO OF LSG, MI needed 11 in 6 balls with David and Green - 0,1,1,0,1,1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.