IPL 2023, Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Marathi : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. १४ गुणांवर असलेल्या मुंबईला उर्वरित दोन सामने जिंकून क्वालिफायर १ साठी पात्र ठरता येणार आहे, तर लखनौच्या खात्यात १३ गुण आहेत आणि त्यांनाही दोन सामने जिंकून प्ले ऑफमध्ये खेळता येईल. जेसन बेहरनडॉर्फने तिसऱ्या षटकात सलग दोन धक्के देताना LSGला बॅकफूटवर फेकले. त्यात फिरकीपटू पियूष चावलाने त्याच्या पहिल्याच चेंडूवर मोठी विकेट घेतली. परंतु त्याला अम्पायरकडून वॉर्निंग मिळाली.
दीपक हुडा व क्विंट न डी कॉक ही जोडी सलामीला आली. हुडाचा फॉर्म हा LSG साठी डोकेदुखी ठरली आहे आणि दुसऱ्या षटकात त्याने उत्तुंग उडवलेला चेंडू टिपण्यासाठी टीम डेव्हिडने जीवतोड मेहतन घेतली, परंतु अखेरच्या क्षणाला त्याच्याकडून झेल सुटला. पण, तिसऱ्या षटकात जेसन बेहरनडॉर्फने विकेट मिळवलीच... यावेळी डेव्हिडने LSGच्या हुडाचा ( ५) झेल टिपला. बेहरनडॉर्फने पुढच्याच चेंडूवर प्रेरक मंकडची विकेट घेत सलग दोन चेंडूवर दोन धक्के दिले. ( पाहा व्हिडीओ )
आयपीएलच्या अन्य महत्त्वाच्या बातम्या
कसं काय भावा? अरे, मला कुत्रा चावला; मैदानात उतरताच अर्जुन तेंडुलकरनं दाखवली जखम
मृत्यूने कवटाळण्यापूर्वी, मला...: MS Dhoni ने साईन केलेली जर्सी दाखवताना सुनील गावस्कर भावूक
मुंबई इंडियन्सचा पियूष चावला 'लेका'साठी हिरो ठरला, पाहा काय किस्सा घडला
क्विंटन व कृणाल पांड्या यांनी LSGच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. पॉवर प्लेमध्ये त्यांनी २ बाद ३५ धावांपर्यंत संघाला नेले... मुंबई इंडियन्ससाठी यंदाच्या पर्वात सर्वाधिक १९ विकेट्स घेणाऱ्या पियूष चावलाने ७व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर क्विंटनला ( १६) बाद केले. अप्रतिम वळणारा चेंडू क्विंटनच्या बॅटची कड घेत यष्टिरक्षकाच्या हाती विसावला. बाद होण्यापूर्वी क्विंटनने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा टप्पा ओलांडला. दरम्यान, ९व्या षटकात पियूष चावलाला अम्पायरने वॉर्निंग दिली. चावला गोलंदाजी करताना खेळपट्टीच्या डेंजर झोनमध्ये गेला आणि त्याला पहिली वॉर्निंग दिली गेली. त्याने पुन्हा ही चूक केल्यास त्याच्या गोलंदाजीवर सामन्यात बंदी घातली जाईल. त्यानंतर रोहित शर्मानेही त्याला समजावले.