Join us

IPL 2023, Virat vs Gambhir fight : विराट कोहली-गौतम गंभीर यांच्या 'राड्या'चा सूत्रधार कोण? Shocking Video

IPL 2023, Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore Live Marathi : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२३ मध्ये लखनौ सुपर जांयट्सना त्यांच्याच घरी पराभूत केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 00:05 IST

Open in App

IPL 2023, Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore Live Marathi : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२३ मध्ये लखनौ सुपर जांयट्सना त्यांच्याच घरी पराभूत केले. RCBच्या १२६ धावांचा पाठलाग करताना LSGचा संपूर्ण संघ १०८ धावांत तंबूत परतला. लोकेश राहुलचे दुखापतग्रस्त होणे आज लखनौला महागात पडले. आयपीएलमध्ये LSG ने मागील सामन्यात RCBला त्यांच्याच घरी हरवले होते आणि आज त्याची परतफेड झाली. पण, या सामन्यानंतर विराट कोहली विरुद्ध गौतम गंभीर ( Virat Kohli vs Gautam Gambhir) यांच्यात भांडण झाल्याचे दिसले.

 विराट ( ३१) आणि फॅफ ( ४४) यांनी ६१ धावांची भागीदारी करूनही RCBला ९ बाद १२६ धावांपर्यंतच पोहोचता आले.  कृणाल पांड्याने ( ४-०-२१-०), रवी बिश्नोईने ( ४-०-२१-२) व अमित मिश्राने ( ३-०-२१-२) अशी स्पेल टाकली.नवीन उल हकने ३० धावांत ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात, लखनौच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. आयुष बदोनीने पुन्हा संधी गमावली, कायले मायर्स पहिल्याच षटकात माघारी परतला. दीपक हुडा अपयशी ठरला. कृणाल पांड्या, निकोलस पूरन व मार्कस स्टॉयनिस यांनी थोडा संघर्ष दाखवला. पण, अखेर लखनौचा पराभव झाला. ८ चेंडूंत २४ धावांची गरज असताना राहुल फलंदाजीला आला. पण, बंगळुरूने १८ धावांनी सामना जिंकला. 

सामन्यानंतर कायले मायर्स विराटसोबत गप्पा मारताना गंभीर तेथे आला अन् LSGच्या फलंदाजाला घेऊन गेला. त्यावरून विराट चिडल्याचे बोलले जातेय आणि मग वाद झाला. त्यानंतर आणखी एक व्हिडीओ समोर आला त्यात नवीन उल हक विराटच्या अंगावर धावून जाताना दिसला. ग्लेन मॅक्सवेलने त्याला अडवला.

लखनौमध्ये झालेल्या या सामन्यात विराट कोहली खूपच आक्रमक दिसला... झेल घेताच त्याने गौतम गंभीर स्टाईलने तोंडावर बोट ठेवून प्रेक्षकांना गप्प राहण्याची कृती केली आणि मॅच संपल्यानंतर राडाच झाला.. 

पाहा आणखी व्हिडीओ... 

 

 

टॅग्स :आयपीएल २०२३विराट कोहलीगौतम गंभीर
Open in App