IPL 2023, Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना रंगतोय. फॅफ ड्यू प्लेसिस RCBच्या कर्णधारपदी परतला अन् LSG विरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मागील दोन सामन्यांत विराट कोहलीने RCBचे नेतृत्व केले होते आणि फॅफ इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळला होता. या सामन्यापूर्वी RCBने डेव्हिड विलीच्या जागी केदार जाधवला १ कोटीच्या मुळ किमतीत करारबद्ध केले, परंतु तो आज प्लेइंग इलेव्हनमध्ये नाही. पण, आजच्या सामन्यात LSGचा कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) सुरुवातीच्या षटकात दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. लखनौसाठीच नव्हे तर ही टीम इंडियासाठी मोठी गंभीर बाब आहे.
विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी RCBला आतापर्यंत चांगली सुरुवात करून दिली आहे. पण, लोकेशला फिल्डिंग करताना हॅमस्ट्रींग दुखापत झाली अन् तो वेदनेने विव्हळताना दिसला. त्याला नीट चालताही येत नव्हते. त्यामुळे संघाचे टेंशन वाढले. अखेर त्याने मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला अन् कृणाल पांड्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. लोकेशची दुखापत किती गंभीर आहे, हे वैद्यकिय बुलेटिननंतर स्पष्ट होईलच, परंतु ती गंभीर नसावी अशी बीसीसीआयची इच्छा आहे.
जूनमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठीच्या संघात लोकेशची निवड झालेली आहे. रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर यांनी आधीच दुखापतीमुळे WTC Final मधून माघार घेतली आहे. केएस भरत हा एकमेव यष्टिरक्षक संघात आहे आणि लोकेशला राखीव यष्टिरक्षक म्हणून जबाबदारी दिली जाऊ शकते. अशात लोकेशच्या दुखापतीने टीम इंडियाचेही टेंशन वाढले आहे. ७ ते ११ जून या कालावधीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडमध्ये हा सामना होणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"