IPL 2023, Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore Live Marathi : लखनौच्या लहरी वातावरणाने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील आजच्या सामन्यातील मजा घालवली आहे. फिरकीला पोषक खेळपट्टीवर लखनौ सुपर जायंट्सचे गोलंदाज वर्चस्व गाजवताना दिसत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस एकाटा खिंड लढवतोय. आजच्या सामन्यात साऱ्यांच्या नजरा होत्या त्या विराट कोहलीवर ( virat Kohli)... पत्नी अनुष्का शर्माला ( Anushka Sharma) तिच्या वाढदिवसानिमीत्त विराट मोठी खेळी करेल अशी अपेक्षा होती. पण, रवी बिश्नोईच्या 'गुगली'ने त्याला अपयशी केले. विराटची विकेट पाहून बर्थ डे गर्ल अनुष्काही नाराज झाली.
१५ पैकी ४ अनफिट; WTC Final पूर्वी भारताची वाढली डोकेदुखी, IPL खेळताना झालेत जखमी
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना रंगतोय. फॅफ ड्यू प्लेसिस RCBच्या कर्णधारपदी परतला अन् LSG विरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. LSGचा कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) सुरुवातीच्या षटकात दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी RCBला आतापर्यंत चांगली सुरुवात करून दिली आहे. कृणाल पांड्याने लखनौची सूत्र हाती घेतली आणि पॉवर प्लेमध्ये ३ षटकं टाकून RCBच्या धावगतीला लगाम लावली. विराट व फॅफ यांना पहिल्या ६ षटकांत ४२ धावा करता आल्या.
९व्या षटकात रवी बिश्नोईने RCBला पहिला धक्का दिला. विराट ( ३१) फटका मारण्यासाठी पुढे आला अन् बिश्नोईने गुगली टाकला. यष्टिरक्षक निकोलस पूरनने जलद स्टम्पिंग केली. विराटने पहिल्या विकेटसाठी फॅफसह ६१ धावांची भागीदारी केली. अनूज रावतला आज पुढे फलंदाजीला पाठवले, परंतु कृष्णप्पा गौथमच्या गोलंदाजीवर तो ९ धावांवर झेलबाद झाला. ग्लेन मॅक्सवेल ( ४) आज कमाल करू शकला नाही आणि बिश्नोईने त्याला LBW करून माघारी पाठवले. सूयश प्रभूदेसाईने ( ६) अमित मिश्राला विकेट दिली. लखनौमध्ये पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने १५.२ षटकानंतर सामना थांबवला गेला अन् RCBच्या ४ बाद ९३ धावा झाल्या आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023, LSG vs RCB Live Marathi : Ravi Bishnoi removes Virat Kohli with a lovely googly, birthday girl Anushka Sharma in the stands, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.