IPL 2023, Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आजचा सामना रटाळ झाला.. पावसामुळे आधीच खेळपट्टी ओलसर झाली होती आणि त्यामुळे फिरकीपटूंना चांगली साथ मिळाली. लखनौ सुपर जायंट्सच्या ( LSG) कर्णधार लोकेश राहुलला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. कृणाल पांड्याच्या नेतृत्वाखाली LSG ने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( RCB) धावांवर लगाम लागवी. कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसने एकट्याने RCBसाठी खिंड लढवली.
फॅफ ड्यू प्लेसिस RCBच्या कर्णधारपदी परतला अन् LSG विरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी RCBला चांगली सुरुवात करून दिली होती. ९व्या षटकात रवी बिश्नोईने RCBला पहिला धक्का दिला. बिश्नोईच्या गुगलीवर विराट ( ३१) यष्टीचीत झाला. विराटने पहिल्या विकेटसाठी फॅफसह ६१ धावांची भागीदारी केली. अनूज रावत ( ९), ग्लेन मॅक्सवेल ( ४) आणि सूयश प्रभूदेसाई ( ६) हेही फिरकी गोलंदाजांसमोर अपयशी ठरले. सोळावे षटक सुरू असताना पावसामुळे काही काळ सामना थांबवावा लागला.
पुन्हा खेळ सुरू झाल्यानंतर दिनेश कार्तिकने काही चांगले फटके मारले, परंतु अमित मिश्राने LSGला मोठे यश मिळवून दिले. फॅफ ४० धावांवर कृणालच्या हाती झेलबाद झाला. कृणालने ( ४-०-२१-०), रवी बिश्नोईने ( ४-०-२१-२) व अमित मिश्राने ( ३-०-२१-२) अशी स्पेल टाकून RCBला दडपणात ठेवले होते. महिपाल लोम्रोरला ( ३) नवीन उल हकने LBW करून माघारी पाठवले. १९व्या षटकात दिनेश कार्तिक ( १६) रन आऊट झाला. शेवटच्या षटकात नवीन उल हकने सलग दोन धक्के दिले. RCB ने ९ बाद १२६ धावा केल्या. नवीन उल हकने ३० धावांत ३ विकेट्स घेतल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023, LSG vs RCB Live Marathi : RCB post the total of 126/9 in 20 overs. What a bowling performance by LSG's bowlers. Naveen picked 3 wickets and Mishra and Bishnoi picked 2 wickets each.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.