IPL 2023, Lucknow Super Giants Vs Sunrisers Hyderabad Live : लखनौ सुपर जायंट्सनेआयपीएल २०२३ मध्ये घरच्या मैदानावर दुसऱ्या विजयाची नोंद केली. सनरायझर्स हैदराबादला फलंदाजीत सपशेल अपयश आले. लखनौच्या गोलंदाजांनी चोख कामगिरी करताना SRHला १२१ धावाच करू दिल्या. LSG च्या ओपनर लोकेश राहुल व कायले मायर्स यांनी दमदार सुरूवात करून दिली. सर्वाधिक ३ विकेट्स घेणाऱ्या कृणाल पांड्याने ( Krunal Pandya) फलंदाजीतही छाप सोडली. कर्णधार लोकेश राहुलने ( KL Rahul) या अवघड खेळपट्टीवर परिपक्व खेळी करून संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला.
राहुल व मायर्स यांनी लखनौला अपेक्षित सुरुवात करून देताना भुवीच्या पहिल्याच षटकात १४ धावा चोपल्या. इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आलेल्या फझहक फारूकीने मायर्सला १३ धावांवर बाद केले. लोकेशसह त्याची ३५ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. SRHची मालकिण काव्या मारन आनंदाने नाचू लागली. भुवीनेही स्वतःच्याच गोलंदाजीवर दीपक हुडाचा अप्रतिम झेल टिपला. पण, कृणालने फलंदाजीत सुरेख फटके मारताना LSG वरील दडपण सहज कमी केले अन् SRHच्या तंबूत पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले. कृणाल व लोकेशने ३५ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण करताना निकाल एकतर्फी केला. उम्रान मलिकने ही भागीदारी तोडताना कृणालला ३४ ( २३ चेंडू) धावांवर बाद केले.
मार्कस स्टॉयनिसनेही चांगले फटके मारले. SRH ने इम्पॅक्ट खेळाडूमध्ये फिरकीपटू असूनही जलदगती गोलंदाजाला घेतल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. विजयासाठी ८ धावा हव्या असताना राहुल रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात LBW झाला. राहुलने ३१ चेंडूंत ३५ धावा केल्या. पुढच्याच चेंडूवर आदील राशीदने LSGच्या रोमारिओ शेफर्डला गुगलीवर LBW केले. निकोलस पूरणने चौकार खेचून राशीदची हॅटट्रिक चुकवली. निकोलसने षटकार खेचून लखनौचा ५ विकेट्स राखून विजय मिळवला.
तत्पूर्वी, LSG च्या गोलंदाजांनी कमाल करून दाखवली. कृणाल पांड्याने सलग दोन चेंडूवर दोन धक्के दिले. अनमोलप्रीत सिंग ( ३१) चांगला खेळत होता, परंतु कृणालने त्याचीही विकेट घेतली. हॅरी ब्रुककडून अपेक्षा होत्या, परंतु तो गोल्डन डकवर परतला. लखनौने ४० वर्षीय अमित मिश्राला आज त्यांच्याकडून पदार्पणाची संधी दिली. कृणाल व रवी यांच्या वळणाऱ्या चेंडूनंतर अमित मिश्राने सनरायझर्सची डोकेदुखी वाढवली. रवी बिश्नोईने ४-०-१६-१ अशी स्पेल टाकली. कृणालने १८ धावांत ३ विकेट्स, तर मिश्राने २३ धावांत २ विकेट्स घेतल्या. राहुल त्रिपाठी ( ३४), वॉशिंग्टन सुंदर ( १६) आणि अब्दुल समद (२१*) यांनी चांगली खेळी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023, LSG vs SRH Live : Lucknow Supergiants have defeated SRH with 24 balls to spare. 2nd win for Lucknow in IPL 2023, beat Hyderabad by 5 wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.