माहेला जयवर्धने, झहीर खान यांच्याबाबत Mumbai Indiansचा मोठा निर्णय; मुख्य प्रशिक्षकाच्या शर्यतीत आफ्रिकेचा दिग्गज

इंडियन प्रीमिअर लीग २०२३मध्ये मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरीच उलथापालथ झालेली पाहायला मिळणार आहे. नवीन संघबांधणी केल्यानंतर पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या MI ला आयपीएल २०२२मध्ये गुणतालिकेत तळावर समाधान मानावे लागले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 11:34 AM2022-09-14T11:34:15+5:302022-09-14T11:34:36+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 : Mahela Jayawardene and Zaheer Khan elevated to new roles within the Mumbai Indians franchise, Mark Boucher to take over as HEAD-COACH of MI  | माहेला जयवर्धने, झहीर खान यांच्याबाबत Mumbai Indiansचा मोठा निर्णय; मुख्य प्रशिक्षकाच्या शर्यतीत आफ्रिकेचा दिग्गज

माहेला जयवर्धने, झहीर खान यांच्याबाबत Mumbai Indiansचा मोठा निर्णय; मुख्य प्रशिक्षकाच्या शर्यतीत आफ्रिकेचा दिग्गज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीग २०२३मध्ये मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरीच उलथापालथ झालेली पाहायला मिळणार आहे. नवीन संघबांधणी केल्यानंतर पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या MI ला आयपीएल २०२२मध्ये गुणतालिकेत तळावर समाधान मानावे लागले होते. सर्वाधिक रक्कम देऊन संघात घेतलेला इशान किशन पूर्णपणे अपयशी ठरला. त्यात आता मुंबई इंडियन्सचा विस्तार वाढला आहे. रिलायन्सचे मालकी हक्क असलेल्या या फ्रँचायझीने दक्षिण आफ्रिका व युएई येथे होणाऱ्या ट्वेंटी-२० लीगमध्ये संघ खरेदी केला आहे. त्यामुळे आता MI फ्रँचायझीच्या वरच्या स्तरावर बदल होताना दिसतोय. मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने ( Mahela Jayawardene) व क्रिकेट डेव्हलपमेंट प्रमुख झहीर खान ( Zaheer Khan) यांच्याबाबत Mumbai Indians ने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आयपीएल २०२३मध्ये मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नवीन चेहरा दिसेल हे निश्चित झाले आहे.

जयवर्धने व  झहीर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्याचा निर्णय मालकांनी घेतला आहे. जागतिक स्तरावरील क्रिकेटमध्ये मुंबई इंडियन्सचं जाळं अधिक बळकट करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. मुंबई इंडियन्सने  MI Emirates आणि MI Cape Town या दोन फ्रँचायझी खरेदी केल्या आहेत. त्यामुळे आता या तीनही संघांवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय यंत्रणा तयार करायची आहे. त्यामुळेच मुख्य प्रशिक्षक जयवर्धने याचा अनुभवाचा फायदा करून घेण्यासाठी त्याच्यकडे Global Head of Performance व झहीरकडे Global Head of Cricket Development ही जबाबदारी सोपवली गेली आहे.


याबाबत रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे चेअरमन आकाश अंबानी म्हणाले की, आमच्या ग्लोबल टीममध्ये माहेला व झहीर यांचा समावेशामुळे मी आनंदी आहे. हे दोघंही MI कुटुंबाचे सदस्य आहेत आणि मुंबई इंडियन्सला त्यांनी ज्या उंचीवर पोहोचवले, तिच उंची जागतिक स्तरावर आता आमच्या अन्य संघांनाही ते मिळवून देतील.  

मार्क बाऊचर मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत
दिग्गज यष्टिरक्षक-फलंदाज मार्क बाऊचर याने ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य प्रशिक्षकाच्या जबाबदारीतून मुक्त होणार असल्याचे नुकतेच जाहीर केले. तो आता मुंबई इंडियन्सच्या आफ्रिकन लीगमधील फ्रँचायझी MI Cape Town यांच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. जयवर्धनेचं प्रमोशन झाल्यामुळे आयपीएल 2023मध्ये मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी बाऊचर दिसू शकतो अशी शक्यता आहे. MI Cape Town संघाने ३ परदेशी, दक्षिण आफ्रिकेचा १ कॅप्ड व आफ्रिकेच्या १ अनकॅप्ड खेळाडूला करारबद्ध केले आहे. कागिसो रबाडा, अफगाणिस्तानचा राशिद खान, इंग्लंडचा लिएम लिव्हिंगस्टोन व सॅम कुरन आणि आफ्रिकेचा अनकॅप्ड खेळाडू डेवॉल्ड ब्रेव्हिस यांना करारबद्ध केले आहे. 
 

Web Title: IPL 2023 : Mahela Jayawardene and Zaheer Khan elevated to new roles within the Mumbai Indians franchise, Mark Boucher to take over as HEAD-COACH of MI 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.