आयपीएलमध्ये काल रात्री झालेल्या ५० व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा यष्टीरक्षक फलंदाज फिल सॉल्ट याने विस्फोटक फलंदाजी केली. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतल्याने बंगळुरी गोलंदाजी पूर्णपणे कोलमडली. आता या सामन्यातील विजयानंतर फिल सॉल्टने असं एक विधान केलं आहे, ज्याने आरसीबीच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे.
सॉल्ट सामन्यानंतर म्हणाला की, माला माहिती होते की, मी खेळपट्टीवर उतरून गोलंदाजांवर दबाव आणला, चांगली सुरुवात केली, तर नंतर येणाऱ्या फलंदाजांना फलंदाजी करणं सोपं जाईल, तसेच सहजपणे सामना जिंकता येईल. तुम्ही खेळता तेव्हा चढ-उतारांचा सामना करावा लागतो. अनेकदा परिस्थिती प्रतिकूल असते. तुम्हाला त्याचा सामना करावा लागतो.
यावेळी सिराजसोबत झालेल्या वादावरही सॉल्टने प्रतिक्रिया दिली. मी माझ्या खेळीवर समाधानी आहे. मात्र या आनंदाला सुई टोचली गेली, असं वाटलं. खेळाडू यासाठी तयार होते. जेव्हा आम्ही बंगळुरू येथे खेळलो होतो, तेव्हाही असं घडलं होतं. त्यामुळे असं काही घडल्यास प्रत्युत्तर द्यायचं. मात्र मर्यादा ओलांडायची नाही, असं ठरलं होतं. आम्हाला वाटतं की, आम्ही चांगली कामगिरी केली. काही शाब्दिक देवाण घेवाण झाली. मात्र नंतर सगळं सुरळीत झालं.
दिल्लीच्या फलंदाजांनी काल मोहम्मज सिराजला लक्ष्य केलं होतं. त्याच्या दोन षटकांमध्ये २८ धावा वसूल केल्या गेल्या. सॉल्ट म्हणाला, आम्ही बंगळुरूच्या सर्वश्रेष्ठ गोलंदाजाला लक्ष्य करण्याची रणनीती आखली होती. त्यांनी सांगितले की, जर तु्म्ही कुठल्याही सर्वश्रेष्ठ गोलंदाजाला लक्ष्य केलं तर ड्रेसिंग रूम आणि डगआऊटमध्ये सकारात्मक संदेश जातो, असे तो म्हणाला.