Join us  

IPL 2023, MI vs CSK : ६,४,४,४,४,४,१! अजिंक्य रहाणेने नोंदवले वेगवान अर्धशतक, मुंबई इंडियन्सची वाढवली डोकेदुखी, Video 

IPL 2023, Mumbai Indians vs Chennai Super Kings :  महेंद्रसिंग धोनीने घरच्या मैदानावर खेळण्याच्या दिलेल्या संधीचं अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) सोनं केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2023 9:58 PM

Open in App

IPL 2023, Mumbai Indians vs Chennai Super Kings :  महेंद्रसिंग धोनीने घरच्या मैदानावर खेळण्याच्या दिलेल्या संधीचं अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) सोनं केलं. पहिल्याच षटकात CSK ला धक्का बसल्यानंतर अजिंक्यचे वादळ मुंबई इंडियन्सवर भारी पडले. त्याने अर्शद खानच्या एका षटकात २३ धावा चोपून क्लास दाखवून दिला. त्याचे तंत्रशुद्ध फटके पाहून वानखेडे स्टेडियमवर एकच जल्लोष सुरू झाला.

रोहित (२१) व इशान ( ३२) यांनी जी सुरुवात करताना ३८ धावांची भागीदारी केली, परंतु हिटमॅनची विकेट पडली अन् यजमानांची गाडी 'लोकल'सारखी घसरली. सूर्यकुमार यादव ( १),  कॅमेरून ग्रीन( १२) आणि अर्शद खान ( १)  अपयशी ठरले. तिलक वर्मा अन् टीम डेव्हिड यांनी काहीकाळ संघर्ष केला. रवींद्र जडेजाने १८ चेंडूंत २२ धावा करणाऱ्या तिलकला मागे पाठवले. जडेजाने २० धावांत ३ विकेट्स घेतल्या. सँटनरनेही २८ धावांत २ बळी टिपले. त्रिस्तान स्टब्सही अपयशी ठरला. टीम डेव्हिड २२ चेंडूंत ३१ धावा करून माघारी परतला. मुंबई इंडियन्सने ८ बाद १५७ धावा केल्या.

लक्ष्य जरी कमी असले तरी ते पार करणे सोपे नक्की नसेल, याची कल्पना CSK ला होती. जेसन बेहरेनडॉर्फने पहिल्या दोन चेंडूवरच त्याची प्रचिती घडवली. तिसऱ्या चेंडूवर डेव्हॉन कॉनवेने फटका मारला, परंतु चेंडू बॅटला लागून यष्टिंवर आदळला. CSKला भोपळ्यावर पहिला धक्का बसला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला अजिंक्य रहाणे आला अन् त्याने दोन चेंडूंत सहा धावा केल्या. अजिंक्यने वादळी खेळी केली... त्याच्या फटक्यांमध्ये नजाकत होती, कोणतात आताताईपणा नव्हता. अर्शद खानने ( Arshad Khan) टाकलेल्या चौथ्या षटकात अजिंक्यने ६,४,४,४,४,४,१असा २३ धावा कुटल्या. पुढच्या षटकातही अजिंक्यची फटकेबाजी सुरू राहिली. अजिंक्यने १९ चेंडूंत ५२ धावा करताना आयपीएल २०२३ मधील सर्वात वेगवान अर्धशतक नोंदवले. त्याने जोस बटलरचा २० ( वि. सनरायझर्स) विक्रम मोडला. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३अजिंक्य रहाणेचेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्स
Open in App