Join us  

IPL 2023, MI vs CSK : स्फोटक खेळीनंतर अजिंक्य रहाणेनं व्यक्त केली मनातली खंत, BCCIला अप्रत्यक्षपणे विनंती  

अजिंक्य रहाणे  ( Ajinkya Rahane) या विजयाचा हिरो ठरला.  MI चे १५८ धावांचे लक्ष्य चेन्नईने १८.१ षटकांत ३ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले.  अजिंक्यने सामन्यानंतर मन मोकळे केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2023 11:31 PM

Open in App

IPL 2023, Mumbai Indians vs Chennai Super Kings : चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर लोळवले. अजिंक्य रहाणे  ( Ajinkya Rahane) या विजयाचा हिरो ठरला.  MI चे १५८ धावांचे लक्ष्य चेन्नईने १८.१ षटकांत ३ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले.  अजिंक्यने सामन्यानंतर मन मोकळे केले. त्याने अप्रत्यक्षपणे BCCI कडे एक विनंती केलीय... 

रोहित (२१) व इशान ( ३२) यांच्या विकेटनंतर यजमानांची गाडी  घसरली. सूर्यकुमार यादव ( १),  कॅमेरून ग्रीन( १२) आणि अर्शद खान ( १)  अपयशी ठरले. तिलक वर्मा ( २२) अन् टीम डेव्हिड यांनी काहीकाळ संघर्ष केला. रवींद्र जडेजाने २० धावांत ३ विकेट्स घेतल्या. सँटनरनेही २८ धावांत २ बळी टिपले. टीम डेव्हिड २२ चेंडूंत ३१ धावा करून माघारी परतला. मुंबई इंडियन्सने ८ बाद १५७ धावा केल्या. तुषार देशपांडेनेही ३१ धावांत २ बळी टिपले.

जेसन बेहरेनडॉर्फने तिसऱ्या चेंडूवर डेव्हॉन कॉनवे ( ०) याचा त्रिफळा उडवला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अजिंक्य रहाणेने  ७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ६१ धावांची खेळी केली. शिवम दुबेने ( २८) ने ऋतुराजसह ४३ धावांची भागीदारी केली. अंबाती रायुडू व ऋतुराजने चेन्नईला ७ विकेट्स राखून मॅच जिंकून दिली.  ऋतुराज ४०, तर रायुडू २० धावांवर नाबाद राहिले.   ( अजिंक्यची ६१ धावांची वादळी खेळी, पाहा Video )

अजिंक्य रहाणे म्हणाला,''मी आजच्या खेळीचा आनंद लुटला, मी केवळ सातत्यपूर्ण खेळ करण्याचा प्रयत्न केला. टायमिंगवर माझा सर्व फोकस होता. वानखेडेवर खेळण्याचा मी नेहमीच आनंद लुटला आहे. इथे मी एकही कसोटी खेळलेलो नाही. मला इथे कसोटी खेळायला आवडेल. माही भाई आणि फ्लेमिंग यांनी संघात सर्वांना स्वातंत्र्य दिले आहे. मोईन अली आजारी पडला आहे आणि त्यामुळे टॉस झाला तेव्हा मी खेळतोय हे मला समजले.''

अजिंक्य रहाणे भारताच्या कसोटी संघातून जानेवारी 2022 पासून बाहेर आहे आणि त्याला अजूनही कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे. त्याने 82 कसोटींत 4931 धावा करताना 12 शतकं व 25 अर्धशतकं झळकावली आहेत. आता BCCI त्याचं वानखेडेवर खेळण्याचं स्वप्न पूर्ण करते का, हे पाहायचं आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३अजिंक्य रहाणेचेन्नई सुपर किंग्सबीसीसीआयमुंबई इंडियन्स
Open in App