IPL 2023, MI vs CSK : १० चेंडूंत ४६ धावा! अजिंक्य रहाणेने CSK कडून पदार्पणात घरचं मैदान गाजवले, MIला चोपले, Video

IPL 2023, Mumbai Indians vs Chennai Super Kings :  महेंद्रसिंग धोनीने घरच्या मैदानावर खेळण्याच्या दिलेल्या संधीचं अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) सोनं केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 10:18 PM2023-04-08T22:18:49+5:302023-04-08T22:19:46+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, MI vs CSK : Ajinkya Rahane scored 61 in just 27 balls with 7 fours and 3 sixes...Watch Video | IPL 2023, MI vs CSK : १० चेंडूंत ४६ धावा! अजिंक्य रहाणेने CSK कडून पदार्पणात घरचं मैदान गाजवले, MIला चोपले, Video

IPL 2023, MI vs CSK : १० चेंडूंत ४६ धावा! अजिंक्य रहाणेने CSK कडून पदार्पणात घरचं मैदान गाजवले, MIला चोपले, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Mumbai Indians vs Chennai Super Kings :  महेंद्रसिंग धोनीने घरच्या मैदानावर खेळण्याच्या दिलेल्या संधीचं अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) सोनं केलं. पहिल्याच षटकात CSK ला धक्का बसल्यानंतर अजिंक्यचे वादळ मुंबई इंडियन्सवर भारी पडले. त्याने अर्शद खानच्या एका षटकात २३ धावा चोपून क्लास दाखवून दिला. त्याचे तंत्रशुद्ध फटके पाहून वानखेडे स्टेडियमवर एकच जल्लोष सुरू झाला. मुंबईकर अजिंक्य आज मुंबई इंडियन्सची डोकेदुखी वाढवून गेला.

६,४,४,४,४,४,१! अजिंक्य रहाणेने नोंदवले वेगवान अर्धशतक, मुंबई इंडियन्सची वाढवली डोकेदुखी, Video 


जेसन बेहरेनडॉर्फने तिसऱ्या चेंडूवर डेव्हॉन कॉनवे ( ०) याचा त्रिफळा उडवला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अजिंक्य रहाणेने घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सविरुद्ध हल्लाबोल केला. त्याच्या फटक्यांमध्ये नजाकत होती, कोणतात आताताईपणा नव्हता. अर्शद खानने ( Arshad Khan) टाकलेल्या चौथ्या षटकात अजिंक्यने ६,४,४,४,४,४,१असा २३ धावा कुटल्या. अजिंक्यने १९ चेंडूंत ५२ धावा करताना आयपीएल २०२३ मधील सर्वात वेगवान अर्धशतक नोंदवले. त्याने जोस बटलरचा २० ( वि. सनरायझर्स) विक्रम मोडला. अजिंक्यने २७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ६१ धावांची वादळी खेळी केली. पीयुष चावलाने त्याची विकेट घेतली.  



तत्पूर्वी, रोहित (२१) व इशान ( ३२) यांनी जी सुरुवात करताना ३८ धावांची भागीदारी केली, परंतु हिटमॅनची विकेट पडली अन् यजमानांची गाडी 'लोकल'सारखी घसरली. सूर्यकुमार यादव ( १),  कॅमेरून ग्रीन( १२) आणि अर्शद खान ( १)  अपयशी ठरले. तिलक वर्मा अन् टीम डेव्हिड यांनी काहीकाळ संघर्ष केला. रवींद्र जडेजाने १८ चेंडूंत २२ धावा करणाऱ्या तिलकला मागे पाठवले. जडेजाने २० धावांत ३ विकेट्स घेतल्या. सँटनरनेही २८ धावांत २ बळी टिपले. त्रिस्तान स्टब्सही अपयशी ठरला. टीम डेव्हिड २२ चेंडूंत ३१ धावा करून माघारी परतला. मुंबई इंडियन्सने ८ बाद १५७ धावा केल्या.

Web Title: IPL 2023, MI vs CSK : Ajinkya Rahane scored 61 in just 27 balls with 7 fours and 3 sixes...Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.