IPL 2023, Mumbai Indians vs Chennai Super Kings : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज IPL मधील El Classico सामना होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन तगडे संघ आज एकमेकांना भिडणार आहेत. पाचवेळा आयपीएल ट्रॉफी उंचावणारा मुंबईचा संघ पहिल्या विजयाच्या शोधात आहे आणि MS Dhoniच्या संघाला पराभूत करून तो मिळवण्याची संधी त्यांना आहे. पण, या सामन्यापूर्वी MIचा गोलंदाज जोफ्रा आर्चरला ( Jofra Archer) दुखापत झाल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे रोहितची डोकेदुखी वाढली होती. पण, आता एक बातमी समोर येतेय आणि त्यामुळे रोहितचं टेंशन दूर झालेलं पाहायला मिळेल.
मोठ्या कंपनीच्या मालकीणला पटवलं अन् आता IPL 2023 मध्येच सोडलं; पाहा ब्युटीचे फोटो
धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. सराव सत्रादरम्यान चेन्नईचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) टाचेत अचानक दुखू लागले, त्यामुळे मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याचे खेळणे संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. स्टोक्सला यातून सावरण्यासाठी 10 दिवस लागू शकतात. चेन्नईचे वैद्यकीय पथक बेन स्टोक्सच्या दुखापतीचा आढावा घेत आहेत आणि त्यानंतर खेळायचे की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले जात आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या मिनी-लिलावात स्टोक्सला चेन्नईने तब्बल १६.२५ कोटी रुपयांना विकत घेतले होते आणि या मोसमात त्याने आतापर्यंत चेन्नईसाठी केवळ सुरुवातीचे दोन सामने खेळले आहेत. स्टॉक्सच्या बॅटमधून १५ धावा आल्या आहेत.
धोनीचा हा आयपीएलचा शेवटचा सीझन असल्याची चर्चा आहे आणि त्याच्यानंतर चेन्नई बेन स्टोक्सला संघाचा कर्णधार बनवेल, असे मानले जात आहे. स्टोक्स सध्या इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार आहे आणि या खेळाडूच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने अनेक मोठ्या मालिका जिंकल्या आहेत. CSKचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली म्हणाला, “सीएसके ही एक प्रकारची फ्रँचायझी आहे जिथे तुम्ही इथे आलात आणि तुम्हाला स्वतःचा आनंद मिळतो आणि या फ्रँचायझीसाठी खेळणे तुम्हाला खरोखर आवडते. तो खरोखर चांगला सेटल झाला आहे. त्याच्या अनुभवाने तो संघाचा एक उत्तम भाग आहे.”
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"