IPL 2023, MI vs CSK : मुंबई इंडियन्सने प्रेक्षकांना निराश केले, MS Dhoniचे डावपेच यशस्वी ठरले; MI कसेबसे दीडशेपार गेले

IPL 2023, Mumbai Indians vs Chennai Super Kings : मुंबई इंडियन्सची गाडी आज लोकल सारखी घसरली..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 09:12 PM2023-04-08T21:12:06+5:302023-04-08T21:17:55+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, MI vs CSK : CSK restricted Mumbai Indians to 157/8, A good finish by Shokeen, but the spin duo of Jadeja and Santner dominated the MI batting unit! | IPL 2023, MI vs CSK : मुंबई इंडियन्सने प्रेक्षकांना निराश केले, MS Dhoniचे डावपेच यशस्वी ठरले; MI कसेबसे दीडशेपार गेले

IPL 2023, MI vs CSK : मुंबई इंडियन्सने प्रेक्षकांना निराश केले, MS Dhoniचे डावपेच यशस्वी ठरले; MI कसेबसे दीडशेपार गेले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Mumbai Indians vs Chennai Super Kings : मुंबई इंडियन्सची गाडी आज लोकल सारखी घसरली.. रोहित शर्मा व इशान किशन यांनी जशी सुरुवात केली होती, ते पाहून आज एक्स्प्रेस मेल धावेल असे वाटले होते. पण, रोहितची विकेट पडली अन् या एक्स्प्रेसचे लोकल ट्रेनमध्ये रुपांतर झाले. त्यात चेन्नई सुपर किंग्सच्या क्षेत्ररक्षकांनीही सुरेख कामगिरी केली. ऋतुराज गायकवाड व ड्वेन प्रेटोरियसचा 'रिले' झेल चर्चेचा विषय ठरला. 

ऋतुराज गायकवाड व ड्वेन प्रेटोरियसचा 'रिले' झेल; एकाने चेंडू रोखला अन् दुसऱ्याने तो टिपला Video  

रोहित (२१) व इशान ( ३२) यांनी जी सुरुवात करताना ३८ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार यादव ( १),  कॅमेरून ग्रीन( १२) आणि अर्शद खान ( १)  अपयशी ठरले.  तिलक वर्मा अन् टीम डेव्हिड यांची जोडी जमली होती.  पण, जडेजाने ही जोडी तोडली. १८ चेंडूंत २२ धावा करणारा तिलक वर्मा LBW झाला. जडेजाने २० धावांत ३ विकेट्स घेतल्या. सँटनरनेही २८ धावांत २ बळी टिपले. त्रिस्तान स्टब्सला आज संधी मिळाली, परंतु सिसांडा मगालाने त्याला माघारी पाठवले. ड्वेन प्रिटोरियस आणि ऋतुराज यांनी मिळून त्याला बाद केले. ( विकेट पाहण्यासाठी क्लिक करा )  


टीम डेव्हिडने १७व्या षटकात ६,४,६ अशी फटकेबाजी करून मुंबईची धावसंख्या झटपट वाढवण्याचा प्रयत्न केला. पण, तुषारने अखेरच्या चेंडूवर त्याला माघारी पाठवले. डेव्हिडने मारलेला फटका अजिंक्य रहाणेने टिपला. डेव्हिड २२ चेंडूंत ३१ धावा करून माघारी परतला. मुंबई इंडियन्सने ८ बाद १५७ धावा केल्या.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: IPL 2023, MI vs CSK : CSK restricted Mumbai Indians to 157/8, A good finish by Shokeen, but the spin duo of Jadeja and Santner dominated the MI batting unit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.