IPL 2023, Mumbai Indians vs Chennai Super Kings : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील पहिला El Classico सामना आज मुंबईच्या वानखेडे स्डेडियमवर होणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज अशी ही लढत पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्साहात आहेत. आयपीएल २०२३तील पहिल्या सामन्यात पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सला RCBविरुद्ध पराभव पत्करावा लागला. CSKला दोन सामन्यांत एक विजय आणि एक पराभव मिळाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील MIसाठी मागील हंगाम दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हता आणि तालिकेत संघ शेवटच्या क्रमांकावर होता. कर्णधार रोहित शर्माचे ( Rohit Sharma) अपयश हे यामागचे सर्वात मोठे कारण होते.
IPL 2023, MI vs CSK : Mumbai Indians जिंकणार! रोहितचा मोठा अडथळा दूर; CSKच्या स्टार अष्टपैलू खेळाडूला दुखापत
रोहित शर्मा २००८ पासून आयपीएलमध्ये खेळतोय. २००८ ते २०१६ या हंगामात रोहितने प्रत्येक वेळी ३५० हून अधिक धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर रोहितची बॅट शांत आहे. गेल्या ६ हंगामात त्याला केवळ दोनदाच ३५०हून अधिक धावा करता आल्या. दोन मोसमात त्याला ३००धावाही करता आल्या नाहीत. गेल्या वर्षी त्याच्या बॅटने १९ च्या सरासरीने आणि १२०च्या स्ट्राईक रेटने २६८ धावा केल्या होत्या. यामध्ये एक पन्नासही नाही. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच रोहितला संपूर्ण मोसमात अर्धशतक झळकावता आले नाही.
आयपीएल २०२३ च्या पहिल्या सामन्यातही रोहितची बॅट पूर्णपणे शांत होती. १० चेंडूंचा सामना करताना तो केवळ एक धाव घेऊन बाद झाला. आज हा सामना वानखेडे स्टेडियमवर आहे. २०११ पासून रोहित मुंबई फ्रँचायझीसाठी खेळत आहे. २०११ ते २०१३पर्यंत त्याने या मैदानावर २३ डावांमध्ये ४४च्या सरासरीने ७१७ धावा केल्या. २०१४ ते २०१७ या कालावधीत २५ डावांमध्ये ६८९ धावा केल्या. २०१८ पासून परिस्थिती आणखी वाईट आहे. १७ डावांमध्ये त्याने २५ च्या सरासरीने ४३४ धावा केल्या आहेत.
कोणताही खेळाडू असाच सतत अपयशी ठरला असता तर तो आतापर्यंत संघाबाहेर गेला असता. प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे तर दूरची गोष्ट होती. पण कर्णधारपदात रोहित हिट ठरला आहे आणि फलंदाजीत अपयशी ठरल्यानंतरही मुंबईने २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये विजेतेपद पटकावले. अशा स्थितीत रोहितवर धावा काढण्याचे दडपण असतेच, शिवाय संघाला विजय मिळवून देण्याचेही दडपण असते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023, MI vs CSK Live : Rohit Sharma's form has become a headache for Mumbai Indians, As the captain, the position in the team remains
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.