IPL 2023, MI vs CSK : दमदार सुरूवात, पण रोहित शर्मा बाद; नोंदवला MI कडून कुणालाच न जमलेला विक्रम, Video

इशान किशन आणि रोहित शर्मा ( Rohit Sharma) या दोघांनी वादळी फटकेबाजी करताना चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांना धूतले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 08:15 PM2023-04-08T20:15:07+5:302023-04-08T20:16:36+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, MI vs CSK :  Rohit Sharma completed 5000 runs for Mumbai Indians, He is the first player to achieve this for the Mumbai franchise, he dismissed for 21 in 13 balls, What a delivery by Tushar Deshpande!, Video | IPL 2023, MI vs CSK : दमदार सुरूवात, पण रोहित शर्मा बाद; नोंदवला MI कडून कुणालाच न जमलेला विक्रम, Video

IPL 2023, MI vs CSK : दमदार सुरूवात, पण रोहित शर्मा बाद; नोंदवला MI कडून कुणालाच न जमलेला विक्रम, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Mumbai Indians vs Chennai Super Kings : एल क्लासिको सामन्याची सुरुवात दणक्यातच झाली... इशान किशन आणि रोहित शर्मा ( Rohit Sharma) या दोघांनी वादळी फटकेबाजी करताना चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांना धूतले. दीपक चहर पहिल्याच षटकात जखमी होऊन माघारी परतल्याने CSK चे टेंशन वाढवले होते. पण, तुषार देशपांडे MS Dhoni च्या मदतीला धावला अन् त्याने हिटमॅनचा दांडा उडवला. पण, रोहितने जाता जाता मोठा विक्रम नोंदवला जो MI कडून कोणालाच नाही जमला.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज IPL मधील El Classico सामना होत आहे. पाचवेळा आयपीएल ट्रॉफी उंचावणारा मुंबईचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या विजयाच्या शोधात आहे. धोनीच्या संघाने एक विजय व एक पराभव असे निकाल नोंदवले आहेत. चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स व मोईन अली हे तगडे खेळाडू नसल्याने चाहते निराश झाले. पण, रोहित व इशान यांनी जी सुरुवात केली त्याने वानखेडेवर नादखुळा जल्लोष सुरू झाला.

रोहित व इशानने चार षटकांत ३८ धावांची भागीदारी केली. तुषार देशपांडेने चौथ्या षटकात रोहितचा ( २१) त्रिफळा उडवला. रोहितने १३ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार खेचले. त्याच्या या खेळीने त्याने मुंबई इंडियन्सकडून ५००० धावा पूर्ण केल्या आणि MI कडून हा टप्पा ओलांडणारा तो पहिला खेळाडू ठरला. रोहितनंतर इशान किशन ( ३२ ) व सूर्यकुमार यादव ( १) यांना अनुक्रमे रवींद्र जडेजा व मिचेल सँटनर यांनी बाद केले. मुंबईचे ३ फलंदाज ६७ धावांत माघारी परतले.  


सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IPL 2023, MI vs CSK :  Rohit Sharma completed 5000 runs for Mumbai Indians, He is the first player to achieve this for the Mumbai franchise, he dismissed for 21 in 13 balls, What a delivery by Tushar Deshpande!, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.