IPL 2023, Mumbai Indians vs Delhi Capitals Live : दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा कर्णधार डेव्हिड वॉर्नर ( David Warner) याल टांग दिली... पृथ्वी शॉची अपयशाची मालिका आजही कायम राहिली. मनीष पांडेने संयमी खेळ करून काहीकाळ वॉर्नरसोबत खिंड लढवली. परंतु मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी त्याचा संयम मोडला अन् पांडेने विकेट फेकली. पदार्पणवीर यश धुल २ धावा करून माघारी परतला. दरम्यान, डावखुरा डेव्हिड वॉर्नर मॅचमध्ये उजव्या हाताने फलंदाजी करताना दिसला.
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांना इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये अद्याप विजयाचे खाते उघडता आलेले नाही. रोहितने आज नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप विजेता संघ यश धूल हा आज दिल्लीकडून पदार्पण करतोय. रायली मेरेडिथ याची त्रिस्तान स्टब्सच्या जागी एन्ट्री झाली आहे. जोफ्रा आर्चर आजच्या सामन्यालाही मुकला आहे. अर्जुन तेंडुलकर इम्पॅक्ट खेळाडूंमध्ये आहे. DCचा ओपनर पृथ्वी शॉ ( १५) चौथ्या षटकात हृतिक शोकीनच्या फिरकीवर फसला. त्यानंतर आलेल्या मनिष पांडेने कर्णधार डेव्हिड वॉर्नरला चांगली साथ देताना ४३ धावांची भागीदारी केली होती, परंतु त्याचाही संयम ९व्या षटकात तुटला. पीयुष चावलाने DCच्या पांडेला ( २६) बाद केले.
हृतिक शोकीनच्या नो बॉलवर दिल्लीला फ्री हिट मिळाला आणि त्यावर वॉर्नरने उजव्या हाताने फलंदाजी केली. त्याने चेंडू हवेत टोलावला, पण त्याला एकच धाव मिळाली. पीयुषने दुसरी विकेट घेताना रोव्हमन पॉवेलला ४ धावांवर पायचीत केले आणि दिल्लीचे चार फलंदाज ८६ वर माघारी परतले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023, MI vs DC Live Marathi : David Warner batted as a right-hander during the free hit, Delhi Capitals loss 4 wickets Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.