IPL 2023, MI vs DC Live : ७ धावांत ५ विकेट्स! दिल्ली कॅपिटल्सचा डाव १० चेंडूंत गडगडला; डेव्हीड वॉर्नर , अक्षर पटेलची मेहनत वाया

IPL 2023, Mumbai Indians vs Delhi Capitals Live : डेव्हिड वॉर्नरने पुन्हा एकदा उपयुक्त खेळी केली आणि यावेळेस त्याला  उप कर्णधार अक्षर पटेलची साथ मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 09:18 PM2023-04-11T21:18:50+5:302023-04-11T21:20:08+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, MI vs DC Live Marathi : David Warner dismissed for 51 & Axar Patel scored 54 in just 25 balls, Piyush Chawala & Jason Behrendorff take 3 wickets each, Mumbai Indians need 173 runs to win  | IPL 2023, MI vs DC Live : ७ धावांत ५ विकेट्स! दिल्ली कॅपिटल्सचा डाव १० चेंडूंत गडगडला; डेव्हीड वॉर्नर , अक्षर पटेलची मेहनत वाया

IPL 2023, MI vs DC Live : ७ धावांत ५ विकेट्स! दिल्ली कॅपिटल्सचा डाव १० चेंडूंत गडगडला; डेव्हीड वॉर्नर , अक्षर पटेलची मेहनत वाया

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Mumbai Indians vs Delhi Capitals Live : डेव्हिड वॉर्नरने पुन्हा एकदा उपयुक्त खेळी केली आणि यावेळेस त्याला  उप कर्णधार अक्षर पटेलची साथ मिळाली. दोघांनी सहाव्या विकेटसाठी दमदार खेळ करताना दिल्ली कॅपिटल्सला सन्मानजनक पल्ला गाठून दिला. मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू पीयुष चावलाने ( Piyush Chawla) सुरुवातीला DCला ३ धक्के दिले होते, परंतु मधल्या षटकांत DC ने डोके वर काढले. अक्षरने २५ चेंडूंत ५४ धावा कुटल्या. जेसन बेहरेनडॉर्फने १९व्या षटकात मुंबईला चार विकेट्स मिळवून देताना लक्ष्य थोडे कमी केले. १८ व्या षटकात ५ बाद १६५ धावा असणारा दिल्लीचा संघ पुढील १० चेंडूंत ७ धावा करून माघारी परतला. 
 

Oh No! कॅच सुटला, सिक्स गेला; सूर्यकुमार यादवला दुखापत झाल्याने मुंबईला धक्का बसला

ओपनर पृथ्वी शॉ ( १५), मनिष पांडे ( २६), ललित यादव ( २) व रोव्हमन पॉवेल ( ४) हे झटपट माघारी परतल्याने दिल्लीचा डाव पुन्हा गडगडला होता. पण, सातत्यपूर्ण खेळी करणाऱ्या कर्णधार डेव्हिड वॉर्नरने संघाला सावरण्याची भूमिका केली. मुंबई इंडियन्सचा अनुभवी फिरकीपटू पीयुष चावलाने  २२ धावांत ३ विकेट घेताना आपला अनुभव दाखवून दिला. वॉर्नर मागील दोन सामन्यांप्रमाणे आजही एकाबाजूने खिंड लढवताना दिसला. अक्षर पटेल आणि वॉर्नर असे दोन डावखुरे फलंदाज मैदानावर असल्याने रोहितने ऑफ स्पीनर तिलक वर्माला गोलंदाजीला आणले. अक्षरने सलग दोन षटकार खेचून शोकीनचे स्वागत केले. 


वॉर्नरने आणखी एक अर्धशतक पूर्ण करताना संघासाठी किल्ला लढवला. मुंबई इंडियन्सविरुद्धचे त्याचे हे ७वे अर्धशतक ठरले आणि त्याने सुरेश रैनाच्या विक्रमाशी बरोबरी केली. ३५ धावांवर अक्षरचा सोपा झेल सूर्यकुमार यादवने टाकला. चेंडू त्याच्या डाव्या डोळ्याच्या बरोबर वरच्या बाजूला आदळला आणि सूर्याला मैदान सोडावे लागले. अक्षरने आपले अर्धशतक पूर्ण करताना वॉर्नरसह ६७ धावा जोडल्या. १९व्या षटकात दिल्लीचे दोन्ही सेट फलंदाज जेसन बेहरेनडॉर्फच्या गोलंजादीवर मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाले.

अक्षर २५ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ५४ धावांवर, तर  वॉर्नर ४७ चेंडूंत ५१ धावांवर बाद झाला. पुढच्याच चेंडूवर कुलदीप यादव रन आऊट झाला. अभिषेक पोरेल ( १) धावांवर बाद झाला. बेहरेनडॉर्फच्या या षटकात चार विकेट्स मिळाल्या. त्याने ३ षटकांत २३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. 
रिले मेरिडिथने शेवटची विकेट घेताना दिल्लीचा डाव १९.४ षटकांत १७२ धावांवर गुंडाळला. 

Web Title: IPL 2023, MI vs DC Live Marathi : David Warner dismissed for 51 & Axar Patel scored 54 in just 25 balls, Piyush Chawala & Jason Behrendorff take 3 wickets each, Mumbai Indians need 173 runs to win 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.