IPL 2023, Mumbai Indians vs Delhi Capitals Live : रोहित शर्माने ( Rohit Sharma) आज त्याचा क्लास दाखवून दिला. २३ एप्रिल २०२१ नंतर रोहितने आज इंडियन प्रीमिअर लीगमधील पहिले अर्धशतक पूर्ण केले. रोहित व तिलक वर्मा मुंबई इंडियन्सचा पहिला विजय पक्का करतील असे चित्र असताना दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी कमबॅक केले. तिलक, सूर्यकुमार यादव ( गोल्डन डक) आणि रोहित माघारी परल्याने मुंबईचे टेंशन वाढले होते.
रोहिने पहिल्या दोन चेंडूंत ४,६ खेचून मुंबई इंडियन्सच्या फॅन्सना खूश केले. पुढच्याच षटकात मुस्ताफिजूर रहमानच्या चेंडूंवर इशान किशनने चौकारांची हॅटट्रिक मारली. एनरिच नॉर्खियाच्या वेगवान चेंडूंना रोहितने दोनवेळा वावराबाहेरची दिशा दिली. ८व्या षटकात सेट झालेली जोडी घाई करून तुटली. ललित यादवच्या गोलंदाजीवर इशानने पॉईंटच्या दिशेने चेंडू मारला. तेथे फिल्डर उभा होता, तरीही रोहित एक धावा घेण्यासाठी पळाला अन् इशानने कर्णधारासाठी स्वतःची विकेट फेकली. इशान ३१ धावांवर रन आऊट झाला.
११ व्या षटकात अक्षरच्या गोलंदाजीवर चेंडू रोहितच्या पॅडवर आदळला आणि जोरदार अपील झाले. मैदानावरील अम्पायरने नॉट आऊट दिल्याने वॉर्नरने DRS घेतला. यात चेंडू यष्टिंवर आदळताना दिसला, परंतु चौथ्या अम्पायरने Umpire Calls कायम राखल्याने रोहितला जीवदान मिळाले. रोहितने २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना फॉर्म परतल्याची झलक दिली. २३ एप्रिल २०२१ नंतर रोहितने आयपीएलमध्ये आज अर्धशतक झळकावले. तिलक वर्मानेही दमदार फटकेबाजी करून दिल्लीच्या विजयाच्या आशांना सुरूंग लावण्याचा प्रयत्न केला. तिलक व रोहितने दुसऱ्या विकेटसाटी ६८ धावा जोडल्या.
१६व्या षटकात मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर तिलकने ४, ६,६ असे फटके मारले आणि आणखी एक उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. तिकलने २९ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह ४१ धावा केल्या. मागील तीन षटकांत मुंबईला केवळ ११ धावा करता आल्या होत्या आणि ते दडपण कमी करण्याचा तिलकने प्रयत्न केला. सूर्यकुमार यादव पुन्हा गोल्डन डकवर झेलबाद झाला. पुढील षटकात मुस्ताफिजूरच्या चेंडूवर यष्टीरक्षक पोरेलने अफलातून झेल घेतला. रोहित ४५ चेंडूंत ६५ धावांवर बाद झाला. रोहितने DRS घेतला अन् त्यातही बॅट व चेंडू यांच्यात संपर्क झाल्याचे स्पष्ट झाले.
Web Title: IPL 2023, MI vs DC Live Marathi : Golden duck for Suryakumar Yadav, MUSTAFIZUR strikes, what a catch by Porel, Rohit Sharma gone on 65 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.