IPL 2023, MI vs DC Live : आत्मघात! गरज नसताना रोहित शर्मा धावला, इशान किशनने कॅप्टनसाठी फेकली स्वतःची विकेट

IPL 2023, Mumbai Indians vs Delhi Capitals Live : दिल्ली कॅपिटल्सने उभ्या केलेल्या १७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने दमदार सुरुवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 10:12 PM2023-04-11T22:12:47+5:302023-04-11T22:17:27+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, MI vs DC Live Marathi : Ishan Kishan run out for 31 in 26 balls, A mixup between Rohit and Ishan! | IPL 2023, MI vs DC Live : आत्मघात! गरज नसताना रोहित शर्मा धावला, इशान किशनने कॅप्टनसाठी फेकली स्वतःची विकेट

IPL 2023, MI vs DC Live : आत्मघात! गरज नसताना रोहित शर्मा धावला, इशान किशनने कॅप्टनसाठी फेकली स्वतःची विकेट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Mumbai Indians vs Delhi Capitals Live : दिल्ली कॅपिटल्सने उभ्या केलेल्या १७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने दमदार सुरुवात केली. रोहित शर्माइशान किशन यांनी सुरेख फटकेबाजी करताना DC चे टेंशन वाढवले. ही सेट झालेली जोडी तोडण्यासाटी डेव्हिड वॉर्नरचे सारे उपाय व्यर्थ ठरले होते. पण, अखेरच MI कॅप्टनच्या चुकीच्या कॉलने दिल्लीला यश मिळवून दिले. इशान किशनने ( Ishan Kishan) रोहितसाठी स्वतःची विकेट फेकली. 

Oh No! कॅच सुटला, सिक्स गेला; सूर्यकुमार यादवला दुखापत झाल्याने मुंबईला धक्का बसला


डेव्हिड वॉर्नरने ( ५१) पुन्हा एकदा उपयुक्त खेळी केली आणि यावेळेस त्याला उप कर्णधार अक्षर पटेलची साथ मिळाली. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ३५ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी केली. मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू पीयुष चावलाने ( Piyush Chawla) सुरुवातीला DCला ३ धक्के दिले होते, परंतु मधल्या षटकांत DC ने डोके वर काढले. अक्षरने २५ चेंडूंत ५४ धावा कुटल्या. जेसन बेहरेनडॉर्फने १९व्या षटकात मुंबईला चार विकेट्स मिळवून देताना लक्ष्य थोडे कमी केले. १८ व्या षटकात ५ बाद १६५ धावा असणारा दिल्लीचा संघ पुढील १० चेंडूंत ७ धावा करून माघारी परतला. 


ओपनर पृथ्वी शॉ ( १५), मनिष पांडे ( २६), ललित यादव ( २) व रोव्हमन पॉवेल ( ४) हे झटपट माघारी परतल्याने दिल्लीचा डाव पुन्हा गडगडला होता. १९व्या षटकात दिल्लीचे दोन्ही सेट फलंदाज जेसन बेहरेनडॉर्फच्या गोलंजादीवर मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाले. कुलदीप यादव रन आऊट झाला. अभिषेक पोरेल ( १) धावांवर बाद झाला. बेहरेनडॉर्फच्या या षटकात चार विकेट्स मिळाल्या. त्याने ३ षटकांत २३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. रिले मेरिडिथने शेवटची विकेट घेताना दिल्लीचा डाव १९.४ षटकांत १७२ धावांवर गुंडाळला. 

प्रत्युत्तरात रोहिने पहिल्या दोन चेंडूंत ४,६ खेचून मुंबई इंडियन्सच्या फॅन्सना खूश केले. पुढच्याच षटकात मुस्ताफिजूर रहमानच्या चेंडूंवर इशान किशनने चौकारांची हॅटट्रिक मारली. आयपीएलमध्ये पहिल्या षटकात सर्वाधिक १२ षटकारांच्या विक्रमात रोहितने ख्रिस गेल व वीरेंद्र सेहवाग यांच्याशी बरोबरी केली. एनरिच नॉर्खियाच्या वेगवान चेंडूंना रोहितने दिशा दाखवताना खणखणीत षटकार व चौकार लगावला. रोहित-इशान आज कुणालाच ऐकत नव्हते आणि दोघांनी पॉवर प्लेमध्ये ६८ धावा चोपल्या. ८व्या षटकात सेट झालेली जोडी घाई करून तुटली. ललित यादवच्या गोलंदाजीवर इशानने पॉईंटच्या दिशेने चेंडू मारला. तेथे फिल्डर उभा होता, तरीही रोहित एक धावा घेण्यासाठी पळाला अन् इशानने कर्णधारासाठी स्वतःची विकेट फेकली. इशान ३१ धावांवर रन आऊट झाला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: IPL 2023, MI vs DC Live Marathi : Ishan Kishan run out for 31 in 26 balls, A mixup between Rohit and Ishan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.