Join us  

IPL 2023, MI vs DC Live : थरारक सामना! ८०८ दिवसानंतर रोहित शर्माने फिफ्टी मारली, मुंबई इंडियन्सने पहिली मॅच जिंकली

IPL 2023, Mumbai Indians vs Delhi Capitals Live : रोहित शर्माने ( Rohit Sharma) आज त्याचा क्लास दाखवून दिला. २३ एप्रिल २०२१ नंतर रोहितने आज इंडियन प्रीमिअर लीगमधील पहिले अर्धशतक पूर्ण केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 11:20 PM

Open in App

IPL 2023, Mumbai Indians vs Delhi Capitals Live : रोहित शर्माने ( Rohit Sharma) आज त्याचा क्लास दाखवून दिला. २३ एप्रिल २०२१ नंतर रोहितने आज इंडियन प्रीमिअर लीगमधील पहिले अर्धशतक पूर्ण केले. मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२३ मधील पहिल्या विजयाची नोंद करताना दिल्ली कॅपिटल्सवर ६ विकेट्सने थरारक विजय मिळवला. रोहित व इशान किशन यांनी दमदार सुरूवात केली आणि इशानच्या विकेटनंतर तिलक वर्माने धावगतीचा वेग कायम राखून दिल्लीचा पराभव निश्चित केला होता. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी कमबॅक केले. तिलक, सूर्यकुमार यादव ( गोल्डन डक) आणि रोहित माघारी परल्याने मुंबईचे टेंशन वाढले होते.  पण, इम्पॅक्ट प्लेअर टीम डेव्हिडने मॅच जिंकून दिली. 

सूर्यकुमार पुन्हा Golden Duck; रोहित शर्माच्या विकेटने वाढवला संभ्रम, पोरेलच्या कॅचने फिरवली मॅच

रोहित व इशान यांची दमदार सुरुवूत करून दिली होती, परंतु ८व्या षटकात इशान ३१ धावांवर रन आऊट झाला. इशानने कर्णधारासाठी स्वतःची विकेट फेकली. रोहितने २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना फॉर्म परतल्याची झलक दिली.  २३ एप्रिल २०२१ नंतर रोहितने आयपीएलमध्ये आज अर्धशतक झळकावले. तिलक वर्मानेही दमदार फटकेबाजी करून दिल्लीच्या विजयाच्या आशांना सुरूंग लावण्याचा प्रयत्न केला. तिलक व रोहितने दुसऱ्या विकेटसाटी ६८ धावा जोडल्या. १६व्या षटकात मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर तिलकने ४, ६,६ असे फटके मारले आणि आणखी एक उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. तिकलने २९ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह ४१ धावा केल्या. 

मागील तीन षटकांत मुंबईला केवळ ११ धावा करता आल्या होत्या आणि ते दडपण कमी करण्याचा तिलकने प्रयत्न केला. सूर्यकुमार यादव पुन्हा गोल्डन डकवर झेलबाद झाला. पुढील षटकात मुस्ताफिजूरच्या चेंडूवर यष्टीरक्षक पोरेलने अफलातून झेल घेतला. रोहित ४५ चेंडूंत ६५ धावांवर बाद झाला. रोहितने DRS घेतला अन् त्यातही बॅट व चेंडू यांच्यात संपर्क झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर इम्पॅक्ट प्लेअर टीम डेव्हिडने १९व्या षटकात दोन षटकारांसह १५ धावा कुटल्या अन् ६ चेंडूंत ५ धावा अशी मॅच आली. २०व्या षटकात मुकेश कुरमाच्या ( २-३०) हातून झेल सुटला. कॅमेरून ग्रीनचा तो झेल होता. तिसऱ्या चेंडूवर अम्पायरने Wide चेंडू दिला अन् वॉर्नरच्या DRS मुळे निर्णय बदलला गेला. ३ चेंडूंत ४ धावा मुंबईला करायच्या होत्या. अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना ग्रीन व टीम डेव्हिड यांनी त्या काढल्या अन् मुंबईने विजय मिळवला. 

तत्पूर्वी, डेव्हिड वॉर्नरने ( ५१) पुन्हा एकदा उपयुक्त खेळी केली आणि यावेळेस त्याला उप कर्णधार अक्षर पटेलची साथ मिळाली. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ३५ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी केली. पीयुष चावलाने ( Piyush Chawla) ३ धक्के दिले मधल्या षटकांत DC ने डोके वर काढले. अक्षरने २५ चेंडूंत ५४ धावा कुटल्या. जेसन बेहरेनडॉर्फने १९व्या षटकात मुंबईला चार विकेट्स मिळवून देताना लक्ष्य थोडे कमी केले. १८ व्या षटकात ५ बाद १६५ धावा असणारा दिल्लीचा संघ पुढील १० चेंडूंत ७ धावा करून माघारी परतला. जेसन  बेहरेनडॉर्फने ३ षटकांत २३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. रिले मेरिडिथने शेवटची विकेट घेताना दिल्लीचा डाव १९.४ षटकांत १७२ धावांवर गुंडाळला.  

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्सरोहित शर्मा
Open in App