IPL 2023, MI vs DC Live : Oh No! कॅच सुटला, सिक्स गेला; सूर्यकुमार यादवला दुखापत झाल्याने मुंबईला धक्का बसला

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांना आयपीएल २०२३ मध्ये अद्याप विजयाचे खाते उघडता आलेले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 09:01 PM2023-04-11T21:01:47+5:302023-04-11T21:02:04+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, MI vs DC Live Marathi :  Suryakumar Yadav has dropped a regulation catch near the boundary. Completely missed it and seems to have hurt himself near eyes | IPL 2023, MI vs DC Live : Oh No! कॅच सुटला, सिक्स गेला; सूर्यकुमार यादवला दुखापत झाल्याने मुंबईला धक्का बसला

IPL 2023, MI vs DC Live : Oh No! कॅच सुटला, सिक्स गेला; सूर्यकुमार यादवला दुखापत झाल्याने मुंबईला धक्का बसला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Mumbai Indians vs Delhi Capitals Live : डेव्हिड वॉर्नरला अखेर उप कर्णधार अक्षर पटेलची साथ मिळाली आणि दोघांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी + भागीदारी करताना मुबंई इंडियन्सची डोकेदुखी वाढवली. त्यात MI चा प्रमुख खेळाडू सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. 

डावा' डेव्हिड वॉर्नर बनला 'उजवा', रोहित शर्माही चक्रावला; दिल्लीच्या फलंदाजांची कर्णधाराला टांग

रोहित शर्माने आज नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. DCचा ओपनर पृथ्वी शॉ ( १५) चौथ्या षटकात हृतिक शोकीनच्या फिरकीवर फसला. त्यानंतर आलेल्या मनिष पांडेने कर्णधार डेव्हिड वॉर्नरला चांगली साथ देताना ४३ धावांची भागीदारी केली होती, परंतु त्याचाही संयम ९व्या षटकात तुटला. पीयुष चावलाने DCच्या पांडेला ( २६) बाद केले. पीयुषने दुसरी विकेट घेताना रोव्हमन पॉवेलला ४ धावांवर पायचीत केले आणि दिल्लीचे चार फलंदाज ८६ वर माघारी परतले. पीयुषने दिल्लीला आणखी एक धक्का देताना ललित यादवची ( २) विकेट घेतली. पीयुषने २२ धावांत ३ विकेट घेताना आपला अनुभव दाखवून दिला.


वॉर्नर मागील दोन सामन्यांप्रमाणे आजही एकाबाजूने खिंड लढवताना दिसला. अक्षर पटेल आणि वॉर्नर असे दोन डावखुरे फलंदाज मैदानावर असल्याने रोहितने ऑफ स्पीनर तिलक वर्माला गोलंदाजीला आणले. अक्षरने सलग दोन षटकार खेचून शोकीनचे स्वागत केले. वॉर्नरने आणखी एक अर्धशतक पूर्ण करताना संघासाठी किल्ला लढवला. मुंबई इंडियन्सविरुद्धचे त्याचे हे ७वे अर्धशतक ठरले आणि त्याने सुरेश रैनाच्या विक्रमाशी बरोबरी केली. ३५ धावांवर अक्षरचा सोपा झेल सूर्यकुमार यादवने टाकला अन् रोहित निराश झाला. त्यावेळी सूर्याच्या डोळ्याजवळ दुखापत झाली आणि त्या मैदान सोडावे लागले. चेंडू त्याच्या डाव्या डोळ्याच्या बरोबर वरच्या बाजूला आदळला. 

 

Web Title: IPL 2023, MI vs DC Live Marathi :  Suryakumar Yadav has dropped a regulation catch near the boundary. Completely missed it and seems to have hurt himself near eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.