कालची मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सची दुसऱ्या क्वालिफायरची मॅच जबरदस्त झाली. गुजरात टायटन्सने पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबईला ६२ धावांनी हरविले आणि स्पर्धेतूनच बाहेर केले. थांबा थांबा थांबा... याच गुजरातने मुंबईला प्लेऑफमध्ये पोहोचविले होते. कालचा शतकवीर शुभमन गिल मुंबईसाठी एका क्षणी हिरो ठरला होता, दुसऱ्याच क्षणी व्हिलन ठरला.
गुजरात टायटन्सला आता चारवेळा आयपीएल जिंकणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या टीमसोबत फायनल खेळायची आहे. कालच्या मॅचनंतर मुंबई, शुभमन गिल आणि सारा तेंडूलकर यांना ट्रोल केले जात आहे. वेगवेगळ्या तऱ्हेचे मिम्स व्हायरल केले जात आहेत. सचिन तेंडूलकरलाही लोकांनी सोडले नाहीय. खरेतर हा सामना ज्यांच्या अपयशामुळे मुंबई हरली ते बाजुलाच राहिले, पण गिलसह तेंडुलकर पिता-पुत्री ट्रोल केले जाऊ लागले आहेत.
मुंबई इंडियन्स काही केल्या प्ले ऑफमध्ये जाऊ शकत नव्हती. गुजरातच्या संघाने म्हणजेच शुभमन गिलने चांगले प्रदर्शन केले म्हणून मुंबईला ही संधी मिळाली होती. लीग राऊंडच्या अखेरच्या मॅचमध्ये गुजरातने विराट कोहलीच्या रॉयल चैलेंजर्स बैंगलोरला हरविले होते. जर विराटचा संघ जिंकला असता तर मुंबई बाहेर गेली असती. परंतू, गिलने शतक झळकावले आणि विराटचे शतक फोल ठरवत प्ले ऑफचा घास मुंबईच्या ताटात वाढून ठेवला.
आता फॅन्सनी मुंबईची फिरकी घेण्यास सुरुवात केली आहे. गिलने आधी प्ले ऑफमध्ये पोहोचविले आणि स्वत:च बाहेरही काढले आहे, असे म्हणत आहेत.
मुंबई इंडियन्सचा पराभव झाल्यानंतर ट्विटरवर अनेक मजेदार प्रतिक्रिया आल्या. बघूया कोण काय म्हणाले सोशल मीडियावर...
Web Title: IPL 2023, MI vs GT: Shubman Gill turns hero for Mumbai one moment, villain the next! What happened in the history of IPL 2nd qualifier match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.