Join us  

IPL 2023, MI vs KKR Live : १५ चेंडूंत ७८ धावा! वेंकटेश अय्यरचे विक्रमी शतक; अर्जुन तेंडुलकरला २ षटकांवर समाधान मानावे लागले

IPL 2023, Mumbai Indians vs Kolkata Kinght Riders Live Marathi : अर्जुन तेंडुलकरच्या पदार्पणाची हवा वेंकटेश अय्यरने काढून टाकली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 5:27 PM

Open in App

IPL 2023, Mumbai Indians vs Kolkata Kinght Riders Live Marathi : अर्जुन तेंडुलकरच्या पदार्पणाची हवा वेंकटेश अय्यरने काढून टाकली. कोलकाता नाइट रायडर्सच्या या फलंदाजाने शतकी खेळी करताना मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची डोकेदुखी वाढवली. २००८नंतर KKRकडून शतक झळकावणारा तो दुसरा फलंदाज ठरला. १५ वर्षांपूर्वी ब्रेंडन मॅक्युलमने शतक झळकावले होते. यंदाच्या पर्वातील वेंकी हा दुसरा शतकवीर ठरला. त्याच्याआधी सनरायझर्स हैदराबादच्या हॅरी ब्रूकने शतक झळकावले आहे. पदार्पणवीर अर्जुन तेंडुलकरने २ षटकांत १७ धावा दिल्या. हृतिक शोकीनने दोन विकेट्स घेतल्या.

अर्जुनच्या षटकाने मुंबई इंडियन्सनं डावाची सुरूवात केली. कॅमेरून ग्रीनने दुसऱ्या षटकात KKRच्या एन जगदीसनला ( ०) बाद केले. सहाव्या षटकात गोलंदाजीत बदल करताना पीयुष चावला आला अन् त्याने KKRचा सलामीवीर रहमनुल्लाह गुरबाज ( ८) याला झेलबाद केले.  कर्णधार नितीश राणा ( ५) लगेच बाद झाला, परंतु  माघारी जाताजाता हृतिक शोकीनसोबत त्याचा वाद झाला. दुखापतग्रस्त होऊनही वेंकटेश मैदानावर उभा राहिला. शार्दूल ठाकूर आणि वेंकटेश यांनी २७ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. शोकीनने १३ धावांवर खेळत असलेल्या शार्दूलची विकेट घेतली. 

वेंकटनेशने ९ षटकार व ५ चौकारांच्या मदतीने ४९ चेंडूंत शतक झळकावले. रिले मेरिडिथने मुंबईला ही महत्त्वाची विकेट मिळवून दिली. वेंकटेनश ५१ चेंडूंत ६ चौकार व ९ षटकारांसह १०४ धावांवर झेलबाद झाला. रिंकू सिंग ( १८) आज मोठे फटकेबाजी करू शकला नाही. आंद्रे रसेलने अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी करताना KKRला मोठी धावसंख्या उभारून दिली. ड्युआन यान्सेन ( १-५३) महागडा गोलंदाज ठरला. कोलकाताने ६ बाद १८५ धावा केल्या आणि रसेल ११ चेंडूंत २१ धावांवर नाबाद राहिला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३वेंकटेश अय्यरकोलकाता नाईट रायडर्समुंबई इंडियन्सअर्जुन तेंडुलकर
Open in App