IPL 2023, Mumbai Indians vs Kolkata Kinght Riders Live Marathi : अर्जुन तेंडुलकरचे पदार्पण, रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर अन् सूर्यकुमार यादव कर्णधार... मुंबई इंडियन्सच्या डावपेचांनी सर्वांना केले गपगार. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धचा हा सामना चर्चेत राहण्याची पूर्ण जबाबदारी MI ने आज घेतली. दरम्यान, KKRचा कर्णधार नितीश राणा आणि MI चा फिरकीपटू हृतिक शोकीन यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. हे दोघंही दिल्लीकडून खेळतात...
अर्जुन तेंडुलकरच्या पदार्पणावर सौरव गांगुलीचे ट्विट; सचिन तेंडुलकरबद्दल म्हणाला...
सचिन आणि अर्जुन ही आयपीएलमध्ये खेळणारी पहिली वडील व मुलाची जोडी ठरली आहे. आज अर्जुनच्या षटकाने मुंबई इंडियन्सनं डावाची सुरूवात केली अन् चौथा चेंडू चांगलाच वळला होता व LBW ची अपील झाली. पण, कर्णधार सूर्यकुमार यादवने चर्चा करून DRS न घेण्याचा निर्णय घेतला अन् प्रीव्ह्यूत तो योग्य ठरला. कॅमेरून ग्रीनने दुसऱ्या षटकात KKRला धक्का दिला आणि हृतिक शोकीनने एन जगदीसनचा सुरेख झेल टिपला. आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून ड्युआन यान्सन पदार्पण करतोय आणि आयपीएलमध्ये मार्को व ड्युआन ही खेळणारी पहिली जुळ्या भावांची जोडी आहे. अर्जुनच्या दुसऱ्या षटकात KKRच्या फलंदाजांनी १३ धावा काढल्या.
सहाव्या षटकात गोलंदाजीत बदल करताना पीयुष चावला आला अन् त्याने KKRचा सलामीवीर रहमनुल्लाह गुरबाज ( ८) याला झेलबाद केले. त्यानंतर कर्णधार नितीश राणा फलंदाजीला आला अन् हृतिक शोकीनच्या चेंडूवर उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात ५ धावांवर झेलबाद झाला. तंबूत जात असताना नितीश आमि हृतिक यांच्यात शाब्दिक चकमक झालेली पाहायला मिळाली. नितीशच्या हावभावावरून तो मारण्याची धमकी देत असल्याचे जाणवले. पुढच्याच चेंडूवर इशान किशनने शार्दूल ठाकूरला स्टम्पिंग करण्याची संधी गमावली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"