IPL 2023, Mumbai Indians vs Kolkata Kinght Riders Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज यजमान मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर कोलकाता नाइट रायडर्सचा सामना करत आहे. रोहित शर्मा पोटात दुखत असल्यामुळे आज इम्पॅक्ट खेळाडूंच्या यादीत दिसतोय. सूर्यकुमार यादव आज नेतृत्व करणार आहे. दोन वर्ष बाकावर बसून राहिल्यानंतर आज अखेर अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) पदार्पण करत आहे. सचिन आणि अर्जुन ही आयपीएलमध्ये खेळणारी पहिली वडील व मुलाची जोडी ठरली आहे. अर्जुन तेंडुलकरने ७ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १२ विकेट्स व २२३ धावा, ७ लिस्ट ए क्रिकेटमध्ये ८ आणि ९ ट्वेंटी-२० सामन्यांत १२ विकेट्स घेतल्या आहेत.
आज अर्जुनच्या षटकाने मुंबई इंडियन्सनं डावाची सुरूवात केली अन् चौथा चेंडू चांगलाच वळला होता व LBW ची अपील झाली. पण, कर्णधार सूर्यकुमार यादवने चर्चा करून DRS न घेण्याचा निर्णय घेतला अन् प्रीव्ह्यूत तो योग्य ठरला. अर्जुन सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसोडून गोव्याकडून खेळतोय आणि यंदाच्या रणजी हंगामात त्याने गोवा संघाकडून पदार्पणही केले. सचिन तेंडुलकर १५ मे २००८ मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले होते आणि आज अर्जुन पदार्पण करतोय. कॅमेरून ग्रीनने दुसऱ्या षटकात KKRला धक्का दिला आणि हृतिक शोकीनने एन जगदीसनचा सुरेख झेल टिपला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"