IPL 2023, Mumbai Indians vs Kolkata Kinght Riders Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज यजमान मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर कोलकाता नाइट रायडर्सचा सामना करत आहे. रोहित शर्माच्या पोटात दुखत असल्यामुळे तो आज नाणेफेकीला आलेला नाही आणि सूर्यकुमार यादव आज नेतृत्व करणार आहे. दोन वर्ष बाकावर बसून राहिल्यानंतर आज अखेर अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) पदार्पण करत आहे. अर्जुनला चिअर करण्यासाठी बहीण सारा तेंडुलकरही ( Sara Tendulkar) स्टेडियमवर उपस्थित आहे. सचिन आणि अर्जुन ही आयपीएलमध्ये खेळणारी पहिली वडील व मुलाची जोडी ठरली आहे.
मुंबई इंडियन्स वानखेडेवर आज अनोखा उपक्रम साजरा करणार आहे. ३६ NGO मधील १९००० पेक्षा जास्त मुली आणि २०० दिव्यांग मुलं हा सामना पाहण्यासाठी वानखेडेवर हजर राहणार आहे. रिलायन्स फाऊंडेशन आणि मुंबई इंडियन्सच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स (ESA) फॉर ऑल या उपक्रमाचा भाग म्हणून हा उपक्रम राबवला आहे. प्रत्येक हंगामात संघ MI अशा एका सामन्याचे आयोजन करते आणि त्यात शहरातील एनजीओच्या मुलांना स्टेडियमवर मॅच पाहण्यासाठी आणले जाते. MI vs KKR सामना ESA उपक्रमाचा भाग म्हणून मुलींना प्रेरणा देण्यासाठी समर्पित आहे.
कोलकाता नाइट रायडर्स - रहमनुल्लाह गुरबाज, वेंकटेश अय्यर, एन जगदीसन, नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरीन, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, ल्युकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्थी ( Kolkata Knight RidersXI: Rahmanullah Gurbaz (wk), Venkatesh Iyer, N Jagadeesan, Nitish Rana (capt), Rinku Singh, Andre Russell, Sunil Narine, Shardul Thakur, Umesh Yadav, Lockie Ferguson, Varun Chakaravarthy)मुंबई इंडियन्स - कॅमेरून ग्रीन, इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहाल वधेरा, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, पीयुष चावला, डॉन यानसेन, रिली मेरेडिथ ( Mumbai Indians XI: Cameron Green, Ishan Kishan (wk), Tilak Varma, Suryakumar Yadav (capt), Tim David, Nehal Wadhera, Arjun Tendulkar, Hrithik Shokeen, Piyush Chawla, Duan Jansen, Riley Meredith)इम्पॅक्ट खेळाडू - रोहित शर्मा, रमणदीप सिंग, अर्शद खान, विष्णू विनोद, कुमार कार्तिकेया ( Subs: Rohit Sharma, Ramandeep Singh, Arshad Khan, Vishnu Vinod, Kumar Kartikeya)