IPL 2023, Mumbai Indians vs Kolkata Kinght Riders Live Marathi : मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर विजय मिळवला. कोलकाता नाइट रायडर्सने ठेवलेल्या १८६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने वादळी सुरुवात केली. रोहित शर्मा व इशान किशन यांच्या फटकेबाजीनंतर सूर्यकुमार यादवने चांगला खेळ केला. त्याचा फॉर्म परतल्याने MIचे चाहते आनंदीत झाले. तिलक वर्मा, टीम डेव्हिड यांनीही चांगला खेळ केला. अर्जुन तेंडुलकरने पदार्पणात चांगली कामगिरी करत २ षटकांत १७ धावा दिल्या.
इम्पॅक्ट खेळाडू म्हणून रोहित शर्मा मैदानावर आला. इशान किशन व रोहित ( २०) यांनी उत्तुंग फटके मारून पॉवर प्लेमध्ये ७२ धावांचा डोलारा उभा केला. KKRचा इम्पॅक्ट प्लेअर सुयश शर्मा याचे रोहितने षटकाराने स्वागत केले, परंतु पाचव्या चेंडूवर सुयशने विकेट घेतली. उमेश यादवने अफलातून झेल घेतला.
नितीश राणाने पातळी सोडली, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अत्यंत घाणेरडी शिवी दिली
आयपीएलमध्ये एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहितने नावावर केला. त्याने KKR विरुद्ध १०४० धावा करताना शिखर धवनचा ( १०२९ वि. CSk) विक्रम मोडला. वरुण चक्रवर्थीने MIला मोठा धक्का देताना इशानला ५८ ( २५ चेंडू, ५ चौकार व ५ षटकार) धावांवर माघारी जाण्यास भाग पाडले. इशानने आयपीएलमध्ये २००० धावांचा टप्पा आजच्या सामन्यात गाठला.
कर्णधार सूर्या व तिलक वर्मा यांनी मुंबईचा डाव सावरला. सूर्या आज फॉर्मात परतलेला पाहून चाहते सुखावले. सुयशने १४व्या षटकात चांगली गोलंदाजी केली. चार चेंडू निर्धाव फेकल्यानंतर पाचवा चेंडू तिलकच्या यष्टींचा वेध घेऊन गेला. तिलक ३० धावांवर बाद झाला आणि सूर्यासोबत त्याची ३८ चेंडूंवरील ६० धावांची भागीदारी संपुष्टात आली. सुयशने ४-०-२७-२ अशी स्पेल टाकली. पण, टीम डेव्हिडने १५व्या षटकात दोन उत्तुंग षटकार खेचून MIवर दडपण येऊच दिले नाही. मुंबईला विजयासाठी १० धावांची गरज असताना शार्दूल ठाकूरने विकेट घेतली. सूर्या २५ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ४३ धावांवर बाद झाला. मुंबईने ५ विकेट्स राखून विजय मिळवला. १७.४ षटकांत मुंबईने ५ ब ाद १८६ धावा केल्या. डेव्हिड १३ चेंडूंत २४ धावांवर नाबाद राहिला.
तत्पूर्वी, KKR च्या वेंकटेश अय्यरने ५१ चेंडूंत ६ चौकार व ९ षटकारांसह १०४ धावांची दमदार खेळी केली. १५ वर्षांपूर्वी ब्रेंडन मॅक्युलमने KKRसाठी पहिले शतक झळकावले होते. पदार्पणवीर अर्जुन तेंडुलकरने २ षटकांत १७ धावा दिल्या. हृतिक शोकीनने दोन विकेट्स घेतल्या. शार्दूल ठाकूर आणि वेंकटेश यांनी २७ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. रिंकू सिंग ( १८) आज मोठे फटकेबाजी करू शकला नाही. आंद्रे रसेलने ११ चेंडूंत नाबाद २१ धावा करून कोलकाताला ६ बाद १८५ धावा करून दिल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023, MI vs KKR Live :Suryakumar yadav and Ishan kishan shine; Mumbai Indians have defeated KKR by 5wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.