IPL 2023, MI vs KKR : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील कालचा सामना ऐतिहासिक ठरला... महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन याचे आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण झाले. २०२१पासून अर्जुन MI फ्रँचायझीचा सदस्य आहे आणि त्याला पदार्पणाची संधी मिळालेली नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्येही मुंबईकडून संधी न मिळाल्याने अर्जुनने गोवा संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सनेही त्याला दोन-तीन वर्ष बाकावर बसवून ठेवले होते. आयपीएल २०२३ ला सुरूवात होण्यापूर्वी जसप्रीत बुमराहने दुखापतीमुळे माघार घेतली आणि रोहित शर्मा अर्जुनला संधी देईल अशी आशा निर्माण झाली होती.
तू इथपर्यंत पोहोचण्यासाठी अथक मेहनत घेतली आहेस! सचिन तेंडुलकरचे अर्जुनच्या पदार्पणावर भावनिक ट्विट
अर्जुनच्या पदार्पणाचा अखेर तो दिवस उजाडला अन् कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध त्याने पदार्पण केले. २३ वर्षीय डावखुऱ्या जलदगती गोलंदाजाने KKRविरुद्ध दोन षटकांत १७ धावा दिल्या. अर्जुनचे पदार्पण हे त्याच्या कुटुंबियांसाठी स्वप्न सत्यात उतरण्याचा दिवस होता. सचिन तेंडुलकर अन् बहीण सारा यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. या दोघांनी अर्जुनच्या पदार्पणाचा क्षण डोळ्यांत साठवून ठेवला. या अनुभवाबद्दल सचिनने IPL वेबसाईटला एक विशेष मुलाखत दिली आणि त्याने अर्जुनला एवढ्या लोकांसमोर पदार्पण करण्याचा अनुभव सांगितला. अर्जुन गोलंदाजी करत असताना सचिनने ड्रेसिंग रूममध्येच राहणे योग्य समजले. त्याच्या उपस्थितीचा कोणताच दडपण मुलावर जाणवू द्यायचा नव्हता.
या व्हिडीओत अर्जुननेही त्याचा अनुभव सांगितला,'' हा अनुभव अविस्मरणीय होता. २००८ पासून या संघाला मी सपोर्ट करतोय आणि त्या संघाकडून खेळण्याची संधी मिळणे, ही गोष्ट माझ्यासाठी खास आहे. MI आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्याकडून पदार्पणाची कॅप मिळाल्याने खूप आनंद झाला.''
अर्जुनला प्रथमच प्रत्यक्ष मी खेळताना पाहिले, असे सचिनने सांगितले. त्याने मोकळेपणाने आणि कोणतंच दडपण न घेता खेळावे, असे मला वाटते. ''हा माझ्यासाठी नवा अनुभव होता, यापूर्वी या प्रसंगातून मी गेलोच नव्हतो आणि त्याला पहिल्यांदा खेळताना मी पाहिले. त्याने मैदानावर मोकळेपणाने खेळावे आणि स्वतःला सिद्ध करावे. त्याला जे हवंय ते त्यानं करावं, हे मला हवं होतं.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"