Join us  

IPL 2023, MI vs PBKS Live : भारी यॉर्कर! अर्जुन तेंडुलकरने कमाल केली, Mumbai Indians ला मोठी विकेट मिळवून दिली, Video

IPL 2023, Mumbai Indians vs Punjab Kings Live Marathi : अर्जुन तेंडुलकरने ( Arjun Tendulkar) आजच्या सामन्यातही कमाल करून दाखवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 8:16 PM

Open in App

IPL 2023, Mumbai Indians vs Punjab Kings Live Marathi : अर्जुन तेंडुलकरने ( Arjun Tendulkar) आजच्या सामन्यातही कमाल करून दाखवली. मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स या लढतीत अर्जुनच्या भन्नाट यॉर्करने सर्वांना वेड लावले. 

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये विजयाची हॅटट्रिक साजरी करणारा मुंबई इंडियन्सचा संघ आज घरच्या मैदानावर पंजाब किंग्सचा सामना करणार आहे.  रोहित शर्मा व इशान किशन यांनी आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सला दमदार सुरुवात करून दिली. रोहित व किशन यांनी ९.६१च्या सरासरीने जोडीने धावा केल्या आहेत आणि जॉस बटलर व यशस्वी जैस्वाल ( ९.७५) यांच्यानंतरची ती यशस्वी जोडी आहे.  पंजाब किंग्सने आतापर्यंत ६ सामन्यांत ३ विजय व ३ पराभव असे निकाल मिळवले आहेत. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून पंजाब किंग्सविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जोफ्रा आर्चरचे आज पुनरागमन झाले.

कॅमेरून ग्रीनने तिसऱ्या षटकात PBKSला धक्का देताना मॅथ्यू शॉर्टला ( ११) बाद केले. प्रभसिमरन सिंगने चांगली फटकेबाजी सुरू केली. अथर्व तायडेने चांगली साथ दिल्याने पंजाबने पॉवर प्लेमध्ये १ बाद ५८ धावा उभ्या केल्या. या दोघांनी २४ चेंडूंत ४७ धावा जोडल्या अन् सातव्या षटकात अर्जुन तेंडुलकरने ( Arjun Tendulkar) भन्नाट यॉर्कर टाकून ही भागीदारी तोडली. प्रभसिमरन १७ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह २५ धावांवर LBW झाला. अर्जुनची आयपीएलमधील ही दुसरी विकेट ठरली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३अर्जुन तेंडुलकरमुंबई इंडियन्सपंजाब किंग्स
Open in App