IPL 2023, MI vs PBKS Live : अर्शदीप सिंगची 'यष्टितोड' कामगिरी; अखेरच्या षटकात फिरवली मॅच, घरच्या मैदानावर हरले मुंबई इंडियन्स

IPL 2023, Mumbai Indians vs Punjab Kings Live Marathi : मुंबई इंडियन्से घरच्या मैदानावर लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 11:20 PM2023-04-22T23:20:35+5:302023-04-22T23:24:39+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, MI vs PBKS Live Marathi : Arshdeep Singh to break the middle stump on consecutive deliveries!Punjab Kings beat Mumbai Indians by 13 runs | IPL 2023, MI vs PBKS Live : अर्शदीप सिंगची 'यष्टितोड' कामगिरी; अखेरच्या षटकात फिरवली मॅच, घरच्या मैदानावर हरले मुंबई इंडियन्स

IPL 2023, MI vs PBKS Live : अर्शदीप सिंगची 'यष्टितोड' कामगिरी; अखेरच्या षटकात फिरवली मॅच, घरच्या मैदानावर हरले मुंबई इंडियन्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Mumbai Indians vs Punjab Kings Live Marathi : मुंबई इंडियन्से घरच्या मैदानावर लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. रोहित शर्मा व कॅमेरून ग्रीन यांच्या भागीदारीनंतर ग्रीन व सूर्यकुमार यादव यांनी पंजाब किंग्सच्या गोलंदाजांना चोपले. ग्रीन व सूर्याने वैयक्तिक अर्धशतक झळकावताना MIला  विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. ग्रीन व सूर्या अखेरच्या षटकांत बाद झाल्याने सामन्यात थोडी रंजकता आली होती. टीम डेव्हिडने मोठमोठे फटके मारले होते, परंतु अर्शदीप सिंगने अखेरच्या षटकात भेदक मारा केला अन् दोन स्टम्प्स तोडले. मुंबईचे विजयाचे स्वप्न तिथेच भंगले.

 रोहित शर्मा ठरला 'सिक्सर किंग'; नोंदवला एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम, परदेशी फलंदाजाना आव्हान

प्रत्युत्तरात, इशान किशनला ( १) अर्शदीप सिंगने दुसऱ्याच षटकात माघारी पाठवून MI ला मोठा धक्का दिला. कॅमेरून ग्रीन आणि रोहित शर्मा यांनी MIची खिंड लढवताना ७६ धावांची भागीदारी केली. १२व्या षटकात लिएम लिव्हिंगस्टनला गोलंदाजीला आणले अन् त्याने रोहितची विकेट मिळवून दिली. रोहित २७ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४४ धावांवर कॉट अँड बोल्ड झाला. ग्रीनसोबत त्याची ७६ धावांची भागीदारी संपुष्टात आली. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने लिव्हिंगस्टोनला सलग तीन चौकार खेचले. ( पाहा तो व्हिडीओ


रोहित माघारी परतल्याचं कोणतंच दडपण सूर्याने मुंबईवर येऊ दिले नाही. सूर्या वेगळ्यात फॉर्मात दिसला अन् त्याने ग्रीनसह ३६ चेंडूंत ७५ धावांची भागीदारी केली. ग्रीनने ३८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान सूर्यकुमारने ट्वेंटी-२०त ६००० धावांचा टप्पा ओलांडला. त्याने ४०१७ चेंडूंचा सामना करताना हा टप्पा ओलांडला अन् सर्वात कमी चेंडूंत ६ हजार धावा करणारा तो पाचवा फलंदाज ठरला. या विक्रमात आंद्रे रसेल ( ३५५०), ग्लेन मॅक्सवेल ( ३८९०), किरॉन पोलार्ड ( ३९१८), ख्रिस गेल ( ४००८) हे आघाडीवर आहेत. नॅथन एलिसने गतीमध्ये परिवर्तन करून ग्रीनला माघारी पाठवले. ग्रीनने ४३ चेंडूंत ६७ धावा ( ६ चौकार व ३ षटकार) चोपल्या. मुंबईला २७ चेंडूंत ५६ धावा हव्या असताना ही विकेट पडली.


सूर्यकुमारने त्याची फटकेबाजी कायम राखताना २३ चेंडूंत यंदाच्या आयपीएलमधील पहिले अर्धशतक पूर्ण केले. १८ चेंडूंत मुंबईला ४० धावा हव्या होत्या आणि सुर्याच्या फटकेबाजीने विजयाचा विश्वास जागवला. टीम डेव्हिडही सूसाट सुटला अन् त्याने अर्शदीपला खणखणीत षटकार खेचला. अर्शदीपच्या चेंडूवर सूर्याने मिडविकेटच्या दिशेने चेंडू टोलवला, पण अथर्वने अप्रतिम झेल टिपला. सूर्या २६ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ५७ धावांवर बाद झाला.  टीमने ११४ मीटर लांब षटकार केचला अन् मालकीण नीता अंबानी यांच्यासह रोहित, अर्जुन तो षटकार पाहत बसले. 

 

६ चेंडूंत १६ धावा असा सामना रोमहर्षक वळणावर आला अन् अर्शदीपकडे शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी आली. पहिल्या चेंडूवर एक धाव घेत टीम डेव्हिडने तिलक वर्माला स्ट्राईक दिली. अर्शदीपने तिसऱ्या चेंडूवर तिलकचा त्रिफळा उडवला. त्याच्या चेंडूचा वेग इतका होता की मधल्या स्टम्प्सचे दोन तुकडे झाले. आता ३ चेंडू १५ धावा असा सामना आला. नेहाल वधेराचाही स्टम्प त्याने तोडला अन् सामना पंजाबच्या पारड्यात आणला. मुंबईला ६ बाद २०१ धावा करता आल्या अन् पंजाबने १३ धावांनी सामना जिंकला. 
 

तत्पूर्वी, चौदाव्या षटकापर्यंत मुंबई इंडियन्सने सामन्यावर पकड घेताना PBKS ला ४ बाद ११८ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले होते, परंतु अर्जुनच्या एका षटकात ३१ धावा चोपल्या अन् MIच्या हातून सामना निसटत गेला. सॅम करन ( ५५) व हरप्रीत भाटीया ( ४१) या दोघांनी मुंबईच्या गोलंदाजांना धू धू धुतले व ९२ धावांची भागीदारी केली. पंजाबने अखेरच्या ६ षटकांत १०६ धावा कुटल्या. मॅथ्यू शॉर्ट ( ११), प्रभसिमरन सिंग ( २५) व अथर्व तायडे( २९) हे माघारी परतले होते. पंजाबने ८ बाद २१४ धावांचा डोंगर उभा केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IPL 2023, MI vs PBKS Live Marathi : Arshdeep Singh to break the middle stump on consecutive deliveries!Punjab Kings beat Mumbai Indians by 13 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.