IPL 2023, Mumbai Indians vs Punjab Kings Live Marathi : अर्जुन तेंडुलकरच्या ( Arjun Tendulkar) एका षटकाने पंजाब किंग्सला डोकं वर काढण्याची संधी मिळाली. पंधराव्या षटकापर्यंत मुंबई इंडियन्सने सामन्यावर पकड घेताना PBKS ला ४ बाद ११८ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले होते, परंतु अर्जुनच्या एका षटकात ३१ धावा चोपल्या अन् MIच्या हातून सामना निसटत गेला. सॅम करन व हरप्रीत भाटीया या दोघांनी मुंबईच्या गोलंदाजांना धू धू धुतले.. पंजाबने शेवटच्या ५ षटकांत ३ बाद ९६ धावा केल्या.
6,WD,4,1,4,6,4N,4 ! अरे देवा.... अर्जुन तेंडुलकरला बेक्कार चोपले, रोहित शर्मासह सारे समजवायला आले...
मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कॅमेरून ग्रीनने तिसऱ्या षटकात PBKSला धक्का देताना मॅथ्यू शॉर्टला ( ११) बाद केले. प्रभसिमरन सिंग ( २५) व अथर्व तायडे यांनी २४ चेंडूंत ४७ धावा जोडल्या अन् सातव्या षटकात अर्जुन तेंडुलकरने ( Arjun Tendulkar) भन्नाट यॉर्कर टाकून ही भागीदारी तोडली. लाएम लिव्हिंगस्टोनला ( १०) पीयुष चावलाने बाद केले. लिव्हिंगस्टोन पुढे येऊन फटका मारणार हे पीयुषने आधीच हेरले अन् चेंडू डाव्या बाजूला टाकला. यष्टिरक्षक इशान किशनने तितक्याच चतुराईने Wide चेंडू टिपला अन् स्टम्पिंग केले. त्याच षटकात सेट फलंदाज अथर्व तायडे ( २९) त्रिफळाचीत झाला.
१५ षटकांत पंजाबच्या ४ बाद ११८ धावा झाल्या होत्या आणि रोहितने १६वे षटक अर्जुनला दिले. सॅम करन व हरप्रीतने ३१ धावा चोपल्या. त्यानंतर १७व्या षटकात १३ आणि १८व्या षटकात २५ धावा जोडल्या. हरप्रीत २८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४१ धावांवर बाद झाला. जितेश शर्माने आल्या आल्या सलग दोन षटकार खेचले. १९व्या षटकात सॅम करन बाद झाला. त्याने २९ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ५५ धावा चोपल्या. जितेश ७ चेंडूंत २५ धावांवर बाद झाला. त्याने चार खणखणीत षटकार खेचले. पंजाबने ८ बाद २१४ धावा उभ्या केल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023, MI vs PBKS Live Marathi : Punjab Kings scored 109 runs in last 6 overs, post 214/8 (Curran 55, Harpreet 41; Chawla 2/15) in 20 overs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.