Join us  

IPL 2023, MI vs PBKS Live : खचू नका! पराभवानंतर रोहित शर्माकडून खेळाडूंची समजूत; अर्शदीपबाबतही केलं विधान

IPL 2023, Mumbai Indians vs Punjab Kings Live Marathi : मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातला वानखेडे स्टेडियमवरील सामना जबरदस्त चुरशीचा झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 7:34 AM

Open in App

IPL 2023, Mumbai Indians vs Punjab Kings Live Marathi : मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातला वानखेडे स्टेडियमवरील सामना जबरदस्त चुरशीचा झाला. अर्शदीप सिंगने ( Arshdeep Singh) अखेरच्या षटकात मॅच फिरवली अन् दोन स्टम्प उडवून पंजाब किंग्सला १३ धावांनी विजय मिळवून दिला. या पराभवानंतर MI चा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याने सहकाऱ्यांना धीर दिला आणि त्याच सोबत अर्शदीपचे कौतुक केले.  

अर्शदीप सिंगने सलग चेंडूंवर तोडला मधला 'दांडा'; मुंबईच्या स्वप्नांचा केला चुराडा, पाहा Video

सॅम करन ( ५५) व हरप्रीत भाटीया ( ४१) या दोघांनी ९२ धावांची भागीदारी केली. पंजाबने अखेरच्या ६ षटकांत १०६ धावा कुटल्या. मॅथ्यू शॉर्ट ( ११), प्रभसिमरन सिंग ( २५) व अथर्व तायडे( २९) हे माघारी परतले होते. पंजाबने ८ बाद २१४ धावांचा डोंगर उभा केला. कॅमेरून ग्रीन आणि रोहित शर्मा ( ४४)  यांनी ७६ धावा जोडल्या. सूर्यकुमार यादवने ग्रीनसह ३६ चेंडूंत ७५ धावांची भागीदारी केली. ग्रीनने ४३ चेंडूंत ६७ धावा चोपल्या. सूर्यकुमारने २६ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ५७ धावा केल्या. टीम डेव्हिड १३ चेंडूंत २५ धावांवर खेळत होता. 

६ चेंडूंत १६ धावा असा असताना डेव्हिडने एक धाव घेत तिलक वर्माला स्ट्राईक दिली. अर्शदीपने तिसऱ्या चेंडूवर तिलकचा त्रिफळा उडवला. त्याच्या चेंडूचा वेग इतका होता की मधल्या स्टम्प्सचे दोन तुकडे झाले. पुढच्याच चेंडूवर भन्नाट यॉर्कर टाकून अर्शदीपने नेहाल वधेराच्या स्टम्पचे दोन तुकडे केले.  मुंबईला ६ बाद २०१ धावा करता आल्या अन् पंजाबने १३ धावांनी सामना जिंकला. अर्शदीपने ४-०२९-४ अशी जबरदस्त गोलंदाजी केली.  

रोहित शर्मा म्हणाला, आमच्या क्षेत्ररक्षणात काही त्रुटी होत्या पण त्याकडे जास्त लक्ष देणार नाही. मुलांना सांगेन की खचू नका, आपण तीन सामने जिंकलो आहोत आणि तीन हरलो आहोत. स्पर्धेत बराच वेळ शिल्लक आहे, आम्हाला खेळ आणि स्पर्धेत टिकून राहण्याची गरज आहे. ग्रीन आणि SKY च्या फलंदाजीमुळे खूप आनंदी, त्यांनी आम्हाला शेवटपर्यंत खेळात ठेवले. अर्शदीपला त्याच्या गोलंदाजीचे श्रेय, आजचा दिवस आमचा नाही, परंतु आम्ही चांगली लढत दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३रोहित शर्मामुंबई इंडियन्सअर्शदीप सिंगपंजाब किंग्स
Open in App