Join us  

IPL 2023, MI vs PBKS Live : 6,WD,4,1,4,6,4N,4 ! अरे देवा.... अर्जुन तेंडुलकरला बेक्कार चोपले, रोहित शर्मासह सारे समजवायला आले... 

IPL 2023, Mumbai Indians vs Punjab Kings Live Marathi : अर्जुन तेंडुलकरने ( Arjun Tendulkar) आजच्या सामन्यातही कमाल करून दाखवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 9:08 PM

Open in App

IPL 2023, Mumbai Indians vs Punjab Kings Live Marathi : अर्जुन तेंडुलकरने ( Arjun Tendulkar) आजच्या सामन्यातही कमाल करून दाखवली. मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स या लढतीत अर्जुनच्या भन्नाट यॉर्करने सर्वांना वेड लावले. पण, त्याच्या एका षटकाने पंजाब किंग्सने सामन्यात डोकं वर काढले. सॅम करन व हरप्रीत भाटीया या दोघांनी अर्जुनच्या एका षटकात ३१ धावा चोपल्या आणि हे महागडे षटक ठरले. 

मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कॅमेरून ग्रीनने तिसऱ्या षटकात PBKSला धक्का देताना मॅथ्यू शॉर्टला ( ११) बाद केले. प्रभसिमरन सिंग व अथर्व तायडे यांनी २४ चेंडूंत ४७ धावा जोडल्या अन् सातव्या षटकात अर्जुन तेंडुलकरने ( Arjun Tendulkar) भन्नाट यॉर्कर टाकून ही भागीदारी तोडली. प्रभसिमरन १७ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह २५ धावांवर LBW झाला. अर्जुनची आयपीएलमधील ही दुसरी विकेट ठरली. ( पाहा व्हिडिओ

लाएम लिव्हिंगस्टोनने जोफ्रा आर्चरने टाकलेला चेंडू १०३ मीटर लांब भिरकावला. पण, पीयुष चावलाने १०व्या षटकात चतुराईने त्याची विकेट मिळवली. लिव्हिंगस्टोन पुढे येऊन फटका मारणार हे पीयुषने आधीच हेरले अन् चेंडू डाव्या बाजूला टाकला. यष्टिरक्षक इशान किशनने तितक्याच चतुराईने Wide चेंडू टिपला अन् लिव्हिंगस्टोनला ( १०) स्टम्पिंग केले. त्याच षटकात सेट फलंदाज अथर्व तायडे ( २९) त्रिफळाचीत झाला. चेंडू त्याच्या बॅट अन् पॅडला लागून यष्टिंवर आदळला. पंजाबने १० षटकांत ४ बाद ८३ धावा केल्या. पीयुष आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आला. युझवेंद्र चहल ( १७७), अमित मिश्रा ( १७०) , पीयुष ( १६६) आणि आर अश्विन ( १६५) असा क्रम येतो. 

१५ षटकांत पंजाबच्या ४ बाद ११८ धावा झाल्या होत्या आणि रोहितने १६वे षटक अर्जुनला दिले. सॅम करनने पहिला चेंडू षटकार खेचला अन् अर्जुनवर दडपण आले. पुढचा चेंडू वाईड नंतर चौकार आला. करनने पुढे एक धाव काढली अन् नंतर हरप्रीतने ४,६ खेचला.. नंतर नो बॉलवर चौकार मिळाला. आणखी एक चौकार आला. अर्जुनच्या एका षटकात ३१ धावा आल्या अन् पंजाबने १६ षटकांत ४ बाद १४९ धावा उभ्या केल्या. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :आयपीएल २०२३अर्जुन तेंडुलकरमुंबई इंडियन्सपंजाब किंग्स
Open in App