IPL 2023, Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Live : ग्लेन मॅक्सवेल आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांच्या फटकेबाजीनंतर मुंबई इंडियन्सकडूनही तसाच खेळ अपेक्षित होता. २०० धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात इशान किशनने आक्रमक पवित्रा घेतला, तर रोहित शर्मा सावध खेळ करत होता. मात्र, वनिंदू हसरंगाने एका षटकात दोघांनाही माघारी पाठवले, परंतु रोहितची विकेट वादग्रस्त ठरली.
वानखेडे स्टेडियम आज ग्लेन मॅक्सवेल आणि फॅफ ड्यू प्लेसिस ( Glenn Maxwell and Faf du Plessis) या जोडीने दणाणून सोडले. मुंबई इंडियन्सचा गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फने १६ धावांवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या २ फलंदाजांना माघारी पाठवले. दोघांनी ६२ चेंडूंत १२० धावा जोडल्या. मॅक्सवेलने ३३ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ६८ धावा केल्या. जेसन बेहरेनडॉर्फने ४-०-३६-३ अशी अप्रतिम स्पेल टाकली. ४१ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकार खेचून ६५ धावांवर फॅफ झेलबाद झाला. दिनेश कार्तिकने १९ चेंडूंत ३० धावा केल्या. केदार जाधव १२ आणि वनिंदू हसरंगा १२ धावांवर नाबाद राहून संघाला ६ बाद १९९ धावांपर्यंत नेले.
इशान किशनने मुंबईला स्फोटक सुरुवात करून दिली, तर दुसऱ्या बाजूने रोहित शर्मा संयमी खेळ करताना दिसला. इशानने चौथ्या षटकात जोश हेझलवूडला मारलेला षटकार स्टेडियमबाहेर गेला. पाचव्या षटकात वनिंदू हसरंगाला गोलंदाजीला आणले अन् इशानने त्याला चौकार-षटकार खेचला. पण, हसरंगाने चेंडूचा वेग वाढवला अन् इशानचा यष्टिंमागे सुरेख झेल टिपला गेला. इशान २१ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ४२ धावांवर बाद झाला. त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रोहित ( ७) पायचीत झाला. मैदानावरील अम्पायरने नाबाद दिल्यानंतर फॅफ ड्यू प्लेसिसने DRS घेण्याचा धाडसी निर्णय घेतला अन् तो यशस्वी ठरल्याने RCBच्या ताफ्यात एकच जल्लोष झाला.
आयपीएल २०२३ च्या अन्य महत्त्वाच्या बातम्या
अर्जुन तेंडुलकरला ४ सामन्यानंतर Mumbai Indiansने पुन्हा का नाही खेळवलं? जाणून घ्या कारण
रोहित शर्मा आधी संतापला, पण थोड्या वेळाने नाचू लागला; पहिल्या षटकात नाट्य
नवीन उल हकनं पुन्हा डिवचलं? विराट कोहलीची विकेट पडताच केलं सेलिब्रेशन?
रोहितने पुढे येऊन फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू पॅडवर आदळला. DRS मध्ये चेंडू स्टम्पवर आदळल्याचे दिसले, परंतु रिप्ले पाहताना अम्पायरने 3 मीटर चा नियमानुसार विचार केलाच नाही. तो केला गेला असता तर मैदानावरील अम्पायरच्या निर्णयानुसार रोहित नाबाद राहिला असता. रोहित बराच पुढे आलेला अन् तिसऱ्या अम्पायरच्या निर्णयावर समाचोलक किरण मोरे यांनीही आश्चर्य व्यक्त केले. रोहित सलग पाच डावांत (7, 0, 0, 3, 2 ) एकेरी धावेवर बाद झाला.