IPL 2023, Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Live : १० सामने, ५ विजय, ५ पराभव अन् १० गुण.... मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांची आयपीएल २०२३ गुणतालिकेतील ही परिस्थिती... त्यामुळे प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी दोन्ही संघांसमोर विजय हा एकमेव पर्याय आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर MI vs RCB सामना होत आहे. आजच्या सामन्यापूर्वी जोफ्रा आर्चरने ( Jofra Archer) घेतलेली माघार, हा MI साठी खूप मोठा धक्का आहे. आर्चरचा फॉर्म चांगला नसला तरी तो संघासाठी महत्त्वाचा गोलंदाज होता. दुसरीकडे RCBची फलंदाजांची फौज दमदार कामगिरी करतेय. त्यामुळे त्यांना रोखण्याचं आव्हान आज मुंबईच्या गोलंदाजांसमोर असणार आहे.
- मुंबईचा यशस्वी गोलंदाज पियूष चावलाचा ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये फॅफ ड्यू प्लेसिसविरुद्ध रेकॉर्ड चांगला आहे. त्याने सात डावांत फॅफला २ वेळा बाद केले आहे, तर ५५ चेंडूंत ५२ धावा करू दिल्या आहेत.
- सूर्यकुमार यादवने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये मोहम्मद सिराजविरुद्ध २१८.८च्या स्ट्राईक रेटने २२ चेंडूंत ४८ धावांची खेळी केली आहे आणि एकदाच बाद झालाय.
- टीम डेव्हिडचा वानखेडेवर ३.३ चेंडूत चौकार मारण्याचा विक्रम आहे. त्याने येथे ९८ चेंडूंत २१ षटकार व ९ चौकार खेचले आहेत.
- मुंबईत पहिल्या इनिंग्जमध्ये १९२ ही सरासरी धावसंख्या आहे. रोहित शर्माला यंदाच्या पर्वात येथे साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. जोफ्रा आर्चरच्या जागी MIच्या संघात दाखल झालेला ख्रिस जॉर्डन आज पदार्पण करतोय. जेसन बेहरेनडॉर्फच्या फुलटॉस यॉर्कवर फॅफ ड्यू प्लेसिससचा फटका चूकला अन् नेहाल वढेराकडून झेल सुटला. रोहित शर्मा प्रचंड संतापलेला दिसला. बेहरनडॉर्फच्या चेंडूवर विराट कोहली ( १) पुढे येऊन फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू बॅटला घासून यष्टिरक्षक इशान किशनच्या हाती विसावला.