IPL 2023, Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Live : ग्लेन मॅक्सवेल आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांच्या फटकेबाजीनंतर मुंबई इंडियन्सकडूनही तसाच खेळ अपेक्षित होता. इशान किशन यानेही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाजांची धुलाई केली. पण, वनिंदू हसरंगाने एका षटकात दोन विकेट्स घेतल्या. सूर्यकुमार यादव व नेहल वढेरा यांनी चौकार-षटकारांची आतषबाजी करून RCBच्या गोलंदाजांना हैराण केले आणि २०० धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात १२ षटकांत २ बाद १२४ धावांपर्यंत मजल मारली.
इशान किशनने मुंबईला स्फोटक सुरुवात करून दिली, तर दुसऱ्या बाजूने रोहित शर्मा संयमी खेळ करताना दिसला. इशानने चौथ्या षटकात जोश हेझलवूडला मारलेला षटकार स्टेडियमबाहेर गेला. पाचव्या षटकात वनिंदू हसरंगाला गोलंदाजीला आणले अन् इशानने त्याला चौकार-षटकार खेचला. पण, हसरंगाने चेंडूचा वेग वाढवला अन् इशानचा यष्टिंमागे सुरेख झेल टिपला गेला. इशान २१ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ४२ धावांवर बाद झाला. त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रोहित ( ७) पायचीत झाला. मैदानावरील अम्पायरने नाबाद दिल्यानंतर फॅफ ड्यू प्लेसिसने DRS घेण्याचा धाडसी निर्णय घेतला अन् तो यशस्वी ठरल्याने RCBच्या ताफ्यात एकच जल्लोष झाला.
२ बाद ५२ धावांनंतर सूर्यकुमार यादव आणि नेहल वढेरा यांनी मुंबईचा डाव सावरला आणि १० षटकांत ९९ धावांपर्यंत पोहोचवले. पुढच्या ६० चेंडूंत MI ला १०१ धावा करायच्या होत्या. या दोघांनी MIसाठी उपयुक्त भागीदारी केली. वढेराने ११व्या षटकात वनिंदूला दोन खणखणीत षटकार खेचले अन् त्यातला एक षटकार मैदानावर उभ्या असलेल्या टाटा टिएगो गाडीवर जाऊन आदळला.
आयपीएल २०२३ च्या अन्य महत्त्वाच्या बातम्या
अम्पायर्स, RCBची युती झाली; रोहित शर्माची विकेट ढापली? 3m नियमाकडे दुर्लक्ष
अर्जुन तेंडुलकरला ४ सामन्यानंतर Mumbai Indiansने पुन्हा का नाही खेळवलं? जाणून घ्या कारण
नवीन उल हकनं पुन्हा डिवचलं? विराट कोहलीची विकेट पडताच केलं सेलिब्रेशन?
TATA देणार ५ लाखवढेराने मारलेला षटकार टाटा टिएगो गाडीवर आदळला. त्यामुळे 'टाटा टियागो'चा पत्रा चेपला.TATA कंपनीने सर्व मॅचमध्ये जो खेळाडू सर्वात वेगाने रन्स बनवेल म्हणजेच ज्याचा स्ट्राईक रेट जास्त असेल त्याला कॅश प्राईज आणि टाटा टियागो ईव्ही दिली जाणार आहे. एवढेच नाही तर जेवढ्या वेळा मैदानाजवळ ठेवलेल्या कारला बॉल लागेल तेवढ्या वेळा टाटा वृक्ष लागवड करण्यासाठी कर्नाटकमध्ये कॉफीच्या बागांमध्ये जैव विविधता वाढविण्यासाठी ५ लाख रुपये दान करणार आहे.