IPL 2023, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीगचा १००० वा सामना यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal) संस्मरणीय बनवला, पण, त्याच्या शतकावर टीम डेव्हिडने पाणी फिरवले. हा सामना अम्पायर्सच्या चुकीच्या निर्णयामुळेही चर्चेत राहिला. यशस्वीला No Ball वर बाद दिले गेले, तर रोहित शर्मा त्रिफळाचीत नव्हता तरी बाद ठरला. राजस्थान रॉयल्सच्या २१२ धावांच्या प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नव्हती. सूर्यकुमार यादवचे वादळ घोंगावले अन् सामन्याचे चित्र पालटले. टीम डेव्हिड आणि तिलक वर्माने अखेरच्या षटकांत दमदार खेळ करताना MI ला विजय मिळवून दिला.
रोहित शर्मा 'OUT' नव्हता! बॉल अन् स्टम्पचा संपर्क नाहीच, Viral Video ने आला भूकंप
मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा ( ३) पुन्हा एकदा अपयशी ठरला अन् संदीप शर्माने त्याचा त्रिफळा उडवला. पण, रिप्लेमध्ये चेंडू व स्टम्प यांच्यात कोणताच संपर्क न झाल्याचे समोर आले. इशान किशन आणि कॅमेरून ग्रीन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी करताना मुंबईला ट्रॅकवर आणले. आर अश्विनने या दोन्ही विकेट मिळवल्या. ग्रीन २६ चेंडूंत ४४ धावांत, तर इशान २८ धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादव आज चांगल्या फॉर्मात दिसतोय आणि त्याने उत्तुंग फटकेबाजी मारताना मुंबईच्या विजयाच्या आशा जीवंत ठेवल्या. कुलदीप सेनच्या गोलंदाजीवर तिलक वर्मासाठी LBW ची अपील झाली अन् मैदानावरील अम्पायरने बाद दिले. पण, सूर्याने त्याला DRS घ्यायला लावला अन् त्याला जीवदान मिळाले.
मुंबईला ३६ चेंडूंत ७२ धावा करायच्या होत्या अन् सूर्याची फटकेबाजी पाहून हे सहज शक्य झाले. सूर्याने यंदाच्या पर्वातील दूसरे अर्धशतक झळकावले. आर अश्वीनने आज ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ३०० विकेट्स पूर्ण केल्या. ट्रेंट बोल्टने टाकलेल्या १६व्या षटकात सूर्याने सुरेख फटका मारला, परंतु संदीप शर्माने तितकाच अविश्वसनीय परतीचा झेल टिपला. सूर्या २९ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ५५ धावांवर बाद झाला. ट्रेंट बोल्ट आज ( १-४३) महागडा ठरला अन् मुंबईला १२ चेंडूंत ३२ धावा करायच्या होत्या. टीम डेव्हिड व तिलक वर्मा यांनी चांगली फटकेबाजी केली व मॅच ६ चेंडू १७ धावा अशी रंजक वळणावर आणली.
टीमने पहिलाच चेंडू षटकार खेचला आणि तिलकसह २३ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. दुसरा चेंडूही षटकार खेचून टीमने मॅच एकतर्फी केली. मुंबईने १९.३ षटकांत ४ बाद २१४ धावा करून सामना जिंकला. टीने १४ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ४५ धावा केल्या. तिलक २९ धावांवर नाबाद राहिला.
तत्पूर्वी, यशस्वीने जॉस बटलरसह ( १८) ७२ धावा जोडल्या. एकामागून एक फलंदाज माघारी जात असताना यशस्वी शड्डू ठोकून उभा राहिला. देवदत्त पडिक्कल ( २), जेसन होल्डर ( ११), शिमरोन हेटमायर ( ८) व ध्रुव जुरेल ( २) हेही आज मोठी खेळी करू शकले नाही. यशस्वी ६२ चेंडूंत १२४ धावांवर बाद झाला. त्याच्या या खेळीत १६ चौकार व ८ षटकारांचा समावेश होता. राजस्थानने ७ बाद २१२ धावा केल्या. आयपीएलमध्ये शतक झळकावणारा तो पाचवा अनकॅप्ड फलंदाज ठरला, तर आयपीएलमध्ये शतक झळकावणारा चौथा युवा फलंदाज ठरला. अर्शद खानने ३९ धावांत ३ विकेट्स घेतल्या. रिले मेरेडिथने १ विकेट घेतली, परंतु त्याने ५१ धावा दिल्या. पियूष चावलाने ३४ धावांत २ बळी घेतले. मुंबईने २५ अवांतर धावा दिल्या आणि त्यापैकी १६ धावा Wide ने आल्या.
Web Title: IPL 2023, MI vs RR Live Marathi : 6,6,6! TIM DAVID FINISHES OFF IN STYLE, Mumbai Indians' win by 6 wickets, First time a 200+ target is chased at this venue, History in the 1000th IPL match!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.