IPL 2023, MI vs RR Live : रोहित शर्मा 'OUT' नव्हता! बॉल अन् स्टम्पचा संपर्क नाहीच, Viral Video ने आला भूकंप

आजचा सामना हा अम्पायर्सच्या चुकीच्या निर्णयामुळेही चर्चेत राहिला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 11:05 PM2023-04-30T23:05:07+5:302023-04-30T23:13:12+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, MI vs RR Live Marathi : Rohit Sharma was not out if you see the replay. Sanju's fingers touched the bails from behind, Video  | IPL 2023, MI vs RR Live : रोहित शर्मा 'OUT' नव्हता! बॉल अन् स्टम्पचा संपर्क नाहीच, Viral Video ने आला भूकंप

IPL 2023, MI vs RR Live : रोहित शर्मा 'OUT' नव्हता! बॉल अन् स्टम्पचा संपर्क नाहीच, Viral Video ने आला भूकंप

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीगचा १००० वा सामना यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal) संस्मरणीय बनवला. आजचा सामना हा अम्पायर्सच्या चुकीच्या निर्णयामुळेही चर्चेत राहिला. ज्या फुलटॉस चेंडूवर यशस्वी बाद झाला तो No Ball असल्याचा दावा अनेकांनी केला आणि रिल्पेतही ते स्पष्ट दिसले, परंतु तिसऱ्या अम्पायरने RRच्या फलंदाजाला बाद दिले. तसेच काहीसे MIचा कर्णधार रोहित शर्मा याच्यासोबत घडले. 

'यशस्वी' भव! मुंबईकरांना 'पाणीपूरी' खायला घालणाऱ्याने आज Mumbai Indiansला पाणी पाजले


यशस्वीने जॉस बटलरसह ( १८) पहिल्या विकेटसाठी ७.१ षटकांत ७२ धावा जोडल्या.  एकामागून एक फलंदाज माघारी जात असताना यशस्वी शड्डू ठोकून उभा राहिला. देवदत्त पडिक्कल ( २), जेसन होल्डर ( ११), शिमरोन हेटमायर ( ८) व ध्रुव जुरेल ( २) हेही आज मोठी खेळी करू शकले नाही. यशस्वी ६२ चेंडूंत १२४ धावांवर बाद झाला. त्याच्या या खेळीत १६ चौकार व ८ षटकारांचा समावेश होता. राजस्थानने ७ बाद २१२ धावा केल्या. आयपीएलमध्ये शतक झळकावणारा तो पाचवा अनकॅप्ड फलंदाज ठरला, तर आयपीएलमध्ये शतक झळकावणारा चौथा युवा फलंदाज ठरला.  अर्शद खानने ३९ धावांत ३ विकेट्स घेतल्या. रिले मेरेडिथने १ विकेट घेतली, परंतु त्याने ५१ धावा दिल्या. पियूष चावलाने ३४ धावांत २ बळी घेतले.


प्रत्युत्तरात, मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा ( ३) पुन्हा एकदा अपयशी ठरला अन् संदीप शर्माने त्याचा त्रिफळा उडवला. इशान किशन आणि कॅमेरून ग्रीन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी करताना मुंबईला ट्रॅकवर आणले. आर अश्विनने या दोन्ही विकेट मिळवल्या. ग्रीन २६ चेंडूंत ४४ धावांत, तर इशान २८ धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादव आज चांगल्या फॉर्मात दिसतोय आणि त्याने उत्तुंग फटकेबाजी मारताना मुंबईच्या विजयाच्या आशा जीवंत ठेवल्या आहेत. पण, रोहितच्या विकेटने वाद सुरू झालाय... संदीप शर्माने टाकलेला चेंडू यष्टिंच्या संपर्कातही आला नव्हता अन् बेल्स यष्टिरक्षक संजू सॅमसनच्या ग्लोव्ह्जने पडल्य़ा होत्या. 


Web Title: IPL 2023, MI vs RR Live Marathi : Rohit Sharma was not out if you see the replay. Sanju's fingers touched the bails from behind, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.