IPL 2023, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीगच्या १००० व्या सामन्यात मोठा वाद सुरू झाला आहे. पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध २१ वर्षीय यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal ) अविश्वसनीय खेळी केली. राजस्थान रॉयल्सच्या या युवा फलंदाजाने १२४ धावांची खेळी करताना अनेक विक्रम नावावर केले, परंतु त्याची विकेट वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
यशस्वीने जॉस बटलरसह ( १८) पहिल्या विकेटसाठी ७.१ षटकांत ७२ धावा जोडल्या. एकामागून एक फलंदाज माघारी जात असताना यशस्वी शड्डू ठोकून उभा राहिला. देवदत्त पडिक्कल ( २), जेसन होल्डर ( ११), शिमरोन हेटमायर ( ८) व ध्रुव जुरेल ( २) हेही आज मोठी खेळी करू शकले नाही. यशस्वी ६२ चेंडूंत १२४ धावांवर बाद झाला. अनकॅप्ड फलंदाजांमधील ही सर्वोत्तम खेळी ठरला. त्याच्या या खेळीत १६ चौकार व ८ षटकारांचा समावेश होता. राजस्थानने ७ बाद २१२ धावा केल्या.
दरम्यान, २०व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर यशस्वी बाद झाला. अर्शद खानने टाकलेल्या फुलटॉस चेंडूवर यशस्वीने पूल फटका मारला, परंतु चेंडू हवेतच उडाला आणि अर्शदने झेल घेतला. १४१ च्या वेगाने आलेल्या या चेंडूवर यशस्वीने DRS घेतला. तेव्हा रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव अम्पायरसोबत हुज्जत घालताना दिसले. पण अखेर त्यांनी DRS घेऊ दिला. त्यातही चेंडू कमरेच्या वर असल्याचे स्पष्ट दिसत असताना तिसऱ्या अम्पायरने No Ball नाही दिला. त्यांनी सांगताना असे म्हटले की फलंदाज किंचितसा वाकला होता.
या निर्णयावरून आता रोहित शर्मा व अम्पायरव आरोप होताना दिसत आहेत.
Web Title: IPL 2023, MI vs RR Live Marathi : Yashasha Jaiswal is given OUT on No Ball; Allegations are being made against Rohit Sharma and the umpire
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.